शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१२ गावांमध्ये होणार १00 कोटींची पाणीपुरवठय़ाची कामे!

By admin | Updated: March 18, 2016 02:00 IST

जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत अमरावती -बुलडाणा जिल्ह्यातील गावांमधील कामांचा समावेश.

संतोष येलकर/अकोला जलस्वराज्य प्रकल्प टप्पा क्रमांक २ अंतर्गत अमरावती विभागातील अमरावती व बुलडाणा या दोन जिल्ह्यातील १२ गावांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये १00 कोटींची पाणीपुरवठा योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत (मजीप्रा) करण्यात येणार आहेत.जलस्वराज्य प्रकल्प टप्पा क्र.२ अंतर्गत शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने अमरावती विभागातील ४ आणि बुलडाणा जिल्ह्यातील ८ गावांची निवड केली आहे. दोन्ही जिल्ह्यातील शहराजवळील या गावांमध्ये प्रतिमानसी प्रतिदिवस ७0 लीटरप्रमाणे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येकी ५0 कोटी याप्रमाणे दोन्ही जिल्ह्यात १00 कोटींची पाणीपुरवठा योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत करण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने १६ मार्च रोजी मंत्रालयात पाणीपुरवठा स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील ४ गावे आणि बुलडाणा जिल्ह्यातील ४ गावांमध्ये करावयाच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांसंबंधी प्रस्तावांचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता गणेश गोखले यांनी सादरीकरण केले. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ४ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांसंबंधी प्रस्तावांना प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून तत्त्वत: प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, बुलडाणा जिल्ह्यातील चार गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांचे प्रस्ताव परत पाठविण्याच्या सूचना प्रधान सचिवांनी दिल्या. अमरावती जिल्ह्यातील चार गावांमध्ये पाणीपुरवठा करण्याच्या कामांसाठी तत्त्वत: प्रशासकीय मान्यता मिळाल्याने, निविदा प्रक्रियेनंतर संबंधित गावांमध्ये ह्यमजीप्राह्णमार्फत पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात येणार आहेत.पाणीपुरवठा योजनांची अशी होणार कामे! जलस्वराज्य प्रकल्प टप्पा क्रमांक २ अंतर्गत अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या १२ गावांमध्ये १00 कोटींची पाणीपुरवठा योजनांची कामे करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये पाण्याचा उद्भव, जलवाहिनी टाकणे, जलकुंभांची बांधकामे, अशुद्ध पाण्याची जलवाहिनी टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे व वितरण व्यवस्था इत्यादी प्रकारची कामे केली जाणार आहेत.