शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात बटाट्याचे १०० कोटींचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 10:27 IST

एकट्या तळेगाव, पुणे भागात यामुुळे शेतकऱ्यांचे २५ कोटींवर तर राज्यात १०० कोटी रुपयांवर नुकसान झाले असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

- राजरत्न सिरसाटअकोेला: ऊर्जा शक्ती निर्माण करणारे कर्बोदके (कार्बोहाइड्रेट) असलेल्या बटाट्याला ‘कोरोना’मुळे अवकळा आली आहे. वेफर, चिप्स बनविणारे कारखाने ‘लॉक डाऊन’मुळे बंद असल्याने बाजारातील मागणी घटली आहे. परिणामी, बाजारात बटाटा प्रति किलो ५ ते ७ रुपये कमी दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे .एकट्या तळेगाव, पुणे भागात यामुुळे शेतकऱ्यांचे २५ कोटींवर तर राज्यात १०० कोटी रुपयांवर नुकसान झाले असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.राज्यात अलीकडे बटाट्याचे क्षेत्र वाढले असूून, मंचर, पुसेगाव आणि विदर्भात बटाटा पिकाचे हब तयार झाले आहे. पुणे, वाशी, पुसेगाव, मंचर येथे बटाट्याची बाजारपेठ आहे; परंतु कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने २३ मार्चच्या मध्यरात्रीपासूनन देशात ‘लॉकडाऊन’ घोषित केले आहे. यामुळे सर्वच प्रकारची वाहतूक बंद आहे. परिणामी, कमी क्षेत्र असलेल्या शेतकºयांना शेतमाल बाजारात घेऊन जाणे कठीण झाले आहे. अनेक शेतकºयांनी घेतलेले कर्ज व इतर घरगुती खर्चासाठी पैशाची नितांत गरज आहे. तेच तुरळक शेतकरी बटाटा विक्रीसाठी बाजारात आणत आहेत; परंतु बटाट्याचे दर घटले असून, ५० किलो बटाट्याच्या गोणीमागे शेतकºयांना ४०० रुपये कमी दर दिले जात आहेत. राज्यात शेतकºयांनी प्रक्र्रिया उद्योग सुरू केले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील मनोज बुरड यांंचा एमआयडीसीमध्ये चिप्स, वेफर्स बनविण्याचा उद्योग आहे. ‘लॉकडाऊन’मुळे सध्या उत्पादन बंद असून, त्यांच्याकडे तयार असलेल्या पाकीटबंद मालाची मुदत संपत असल्याने हे नुकसानदेखील त्यांना सहन करावा लागत आहे. आजमितीस त्यांच्याकडे ७० हजारांवर वेफर्स, चिप्स बनून तयार होते. त्यांच्याकडे शेती असून, बटाटा लागवड केली आहे; परंतु काढलेला बटाटा २५ दिवसांच्यावर उष्ण हवामानात टिकत नसल्याने बटाटा सडणार आहे.

देशात २० टक्क्यांवर बटाट्याचे नुकसान देशात बटाट्याचे २१ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रात ३० ते ३५ हजार हेक्टरपर्यंत हे क्षेत्र वाढले आहे. आजमितीस देशात बटाट्याचे उत्पादन ५ कोटी १३ लाख १० हजार मेट्रिक टन होत आहे. महाराष्ट्रात बटाट्याचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्याची संधी आहे; परंतुु कोरोनाचा परिणाम देशात २० टक्क्यांहून अधिक तर राज्यात ४४० टक्क्यांपर्यंत बटाट्याचे नुकसान झाले असल्याचा अंदाज तज्ज्ञांंनी वर्तविला आहे. बटाट्याचे दर एका ५० किलोच्या गोणीमागे ४०० ते ५०० रुपयांनी घटले आहेत. कर्ज परतफेड, घर खर्चासाठी नितांंत गरज असलेले शेतकरीच बटाटा बाजारात विक्र्रीसाठी घेऊन येत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याकडे शीतगृह नसल्याने बटाटा सडत आहे. एकट्या तळेगाव, पुणे भागात २५ कोटींवर नुकसान झाले आहे.- राजेंद्र्र बारवे, घाऊक विक्रेता कांदा, बटाटा वाशी मार्केट (नवी मुंबई)

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती