शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख ७५ हजार ग्राहकांनी भरले ४३ कोटीचे वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 16:04 IST

३० जूनपर्यंत १ लाख ७५ हजारांपेपक्षा जास्त लघुदाब ग्राहकांनी त्यांच्या ४२ कोटी ६८ लाख रुपयांच्या वीज बिलाचा भरणा केला आहे.

अकोला : लॉकडाऊनंतर मीटर रीडिंगप्रमाणे दिलेले तीन महिन्यांचे एकत्रित वीज बिल अचूक असल्याबाबत अकोला परिमंडळातील ग्राहकांना मेळावे, वेबिनार, मोबाइल व प्रत्यक्ष संवादाद्वारे माहिती दिली जात आहे. या माध्यमातून देण्यात येणाºया वीज बिलाच्या विश्लेषणावर ग्राहक समाधानी असून, ३० जूनपर्यंत १ लाख ७५ हजारांपेपक्षा जास्त लघुदाब ग्राहकांनी त्यांच्या ४२ कोटी ६८ लाख रुपयांच्या वीज बिलाचा भरणा केला आहे. उर्वरित ग्राहकांनीही आपले वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणअकोला परिमंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तीन महिन्यांचे एकत्रित वीज बिल एकरकमी भरणाºया ग्राहकांना वीज बिलात दोन टक्के सूट व मागणी करणाºया ग्राहकांना वीज बिलाचे तीन हप्ते करून देण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. अकोला परिमंडळात गेल्या १५ दिवसांपासून १६९ शाखा कार्यालये, ३१ उपविभाग, ७ विभाग, ३ जिल्हा कार्यालय आणि परिमंडळ कार्यालयात १ असे एकूण २१० ग्राहक मदत कक्ष स्थापन करून ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येत आहे. तसेच ग्राहक शिबिरे, वेबिनारचे आयोजन करून वीज बिलाचे विश्लेषण समजून सांगण्यात येत आहे. याशिवाय ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइलवर संपर्क, ‘एसएमएस’, व्हॉट्स अ‍ॅप मेसेज पाठवून बिलासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. जनजागृती मोहिमेला प्रतिसाद देत व वीज बिलाच्या विश्लेषणावर समाधान व्यक्त करत जून अखेरपर्यंत १ लाख ७५ हजार १९७ ग्राहकांनी त्यांचे ४२ कोटी ६८ लाख रुपयांचे वीज बिल भरले आहे.तीन समान हप्त्यात भरता येणार बिलऊजामंत्री डॉ. राऊत यांनी जाहीर केल्याप्रमाणे या ग्राहकांना दोन टक्के सवलतीचा लाभ चालू महिन्याच्या बिलात मिळेल. तसेच ग्राहकांना वीज बिलाचे तीन सामान हप्ते करून वीज बिल भरता येणार आहेत. या सुविधांचा लाभ घेऊन उर्वरित ग्राहकांनी आपले वीज बिल भरून कठीण आर्थिक परिस्थितीत महावितरणला सहकार्य करण्याची गरज आहे. असे आवाहनही अकोला परिमंडळाकडून करण्यात येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणAkola Zoneअकोला परिमंडळ