शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकाची दुचाकी अडवून १ लाख ४५ हजार रुपयांची रोकड लंपास;मुर्तीजापूर येथील घटना

By atul.jaiswal | Updated: May 9, 2024 13:08 IST

अज्ञात युवकांविरुद्ध गुन्हा दाखल

मुर्तीजापूर (जि. अकोला) : जुनी वस्ती भगतसिंग चौक आठवडी बाजार रोडवर असलेल्या गुप्ता वाईन शॉप चे मालक राजेश गुप्ता हे मंगळवार, ७ मेंच्या रात्री आपले दुकान बंद करून घरी जात असताना २० ते २५ वयोगटातील चार अज्ञात युवकांनी जिल्हा परिषद शाळेजवळ रात्री १ वाजताच्या सुमारास त्यांची दुचाकी अडवून काठीने मारहाण करून त्यांच्या जवळची १ लाख ४५ हजार रूपयांची रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली.

गुप्ता वाईन शॉप चे मालक राजेश गुप्ता (४४, रा. शिवाजी नगर) यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ते मंगळवार, ७ मे च्या रात्री १ वाजताचे सुमारास आपले दुकान बंद करून दुकानातील रोख १ लाख २३ हजार ५०० रूपये बॅगेत ठेवली. बाजुलाच असलेल्या आपल्या मोठ्या भावाच्या सारीका वाईन बार दुकानातून दिलेले २१ हजार ५०० रुपये त्याच बॅगेत ठेवून ते आपल्या माणसासोबत दुचाकीने घरी जायला निघाले.

जिल्हा परिषद शाळेजवळ अंधाराचा फायदा घेऊन मागून आलेल्या अज्ञात दुचाकीस्वारांनी आवाज देऊन थांबविले. जवळ आल्यानंतर अज्ञात दुचाकीस्वारांनी गुप्ता यांना लाथ मारून खाली पाडले व काठीने मारहाण करून जखमी करीत त्यांच्याजवळ असलेली १ लाख ४५ हजार रूपयांची बॅग हिसकावून पळ काढला.या फिर्यादी वरून पोलिसांनी चार अज्ञात युवकांविरूद्ध कलम ३९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वडतकर करीत आहेत.