शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख २००८ ‘क्यूआर काेड’ लावले, सर्वेक्षणामुळे काम थांबले !

By नितिन गव्हाळे | Updated: January 30, 2024 21:06 IST

कुठे लावले, कुठे सोडल्याने, नागरिकांमध्ये संभ्रम

नितीन गव्हाळेअकोला : शहरात घरोघरी निघणारा ओला व सुका कचरा संकलित करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरोघरी क्यूआर कोड लावण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रातील घरोघरी क्यूआर कोड लावण्याचे काम सुरू आहेत. आतापर्यंत महापालिका प्रशासनाने १ लाख २००८ क्यूआर कोड लावले आहेत. परंतु मराठा आरक्षणासाठीच्या सर्वेक्षणात कर्मचारी, अधिकारी गुंतल्यामुळे क्यूआर कोडचे काम रखडले आहे. तसेच शहरातील अनेक भागांमध्ये कुठे क्यूआर कोड लावले तर कुठे सोडल्याने, नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ओला व सुका घनकचरा ‘डोअर टू डोअर’ संकलित करण्याच्या दृष्टिकोनातून घरांना ‘क्यूआर काेड’ लावण्यात येत आहेत. गत काही वर्षांपासून शहरात घंटागाडीच्या माध्यमातून घराघरांमधील कचरा संकलित करण्यात येतो. परंतु नागरिक सुका व ओला कचरा वेगवेगळा न करता, एकसोबतच कचरा घंटागाडीत टाकतात. त्यांनी कचऱ्याचे वर्गीकरण करावे आणि स्वच्छ शहर व्हावे. त्यासाठी केंद्र शासनाच्या उपक्रमाच्या माध्यमातून शहरात घरोघरी क्यूआर कोड लावण्याचे काम सुरू आहेत. या कामासाठी महापालिकेचा आराेग्य व स्वच्छता विभाग कामाला लागला आहे.

सर्वच घरांना क्यूआर कोडचे उद्दिष्ट

महापालिका प्रशासनाने अकोला शहरातील सर्वच घरांना क्यूआर कोड लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शहरातील कोणतेही घर यातून सुटणार नाही. हा उपक्रम केंद्र शासनाचा असला तरी, याचा फायदा महापालिका प्रशासनाला होणार आहे. सर्व डाटा महापालिकेकडे जमा होणार असल्याची माहिती महापालिका स्वच्छता विभागाचे प्रमुख प्रशांत राजूरकर यांनी दिली.