शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
2
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
5
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
6
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
7
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
8
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
9
पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला
10
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
11
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
12
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
13
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
14
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
15
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
16
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
17
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
18
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
19
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
20
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन

जिल्हा परिषदेत आघाडी राहिली अभेद्य

By admin | Published: September 21, 2014 11:48 PM

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता.

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रत्यक्षात पदाधिकारी निवडीत ही आघाडी टिकेल की नाही, अशी शंका व्यक्त होत होती. मात्र, दोन्ही पक्षाच्या नेत्यांमुळे आघाडी टिकली. दरम्यान, शनिवार दुपारपासून निवडीबाबत नाट्यपूर्ण राजकीय घडामोडी घडल्या, अफवा पसरल्या आणि आरोपही झाले. मात्र सरतेशेवटी आघाडी अभेद्य राहीली.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची रविवारी निवड झाली. तत्पूर्वी दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या आणि सदस्यांच्या स्वतंत्र बैठका झाल्या. दोन्ही पक्ष एकत्र आल्याने बहुमताचा आकडा कधीच झाला होता. मात्र, अध्यक्षपदासाठी कर्जतच्या मंजुषा गुंड यांचे नाव अंतिम झाल्याने राष्ट्रवादीतील एक गट कमालीचा अस्वस्थ झाला. या गटाने नगर तालुक्यातील इच्छुक कालिंदी लामखडे यांचे नाव उचलून धरले. यासाठी राष्ट्रवादीत नाराज असणाऱ्या सदस्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला. सोबत युतीच्या १२ सदस्यांशी संपर्क करण्यात आला. तर काँग्रेसमधील थोरात गटाला साद घालण्यात आली. ही वार्ता शनिवारी रात्री काँग्रेसच्या गोटात धडकली. यामुळे काँग्रेसने आपला उपाध्यक्षपदाचा उमेदवार रविवारी सकाळी निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अ‍ॅड. सुभाष पाटील, अण्णासाहेब शेलार आणि बाळासाहेब हराळ यांची नावे चर्चेत होती. मात्र, ऐनवेळी कोणाला संधी मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, राष्ट्रवादीची शनिवारी रात्री बैठक झाली. यावेळी पालकमंत्री मधुकर पिचड, निरीक्षक अंकुश काकडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग उपस्थित होते. तालुकानिहाय यावेळी सदस्यांची मते जाणून घेतली. यावेळी नाराज असणाऱ्या नगर तालुक्यातील त्या नेत्यांचे कान पालकमंत्री पिचड यांनी उपटले असल्याचे समजते. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता मंत्री राधाकृष्ण विखे, पालकमंत्री पिचड, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, आ. सुधीर तांबे, आ. चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष अभंग, जयंत ससाणे यांची बैठक झाली. त्यावेळी विषय समित्याच्या निवडीबाबत चर्चा झाली. मंत्री विखे यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांना जिल्हा परिषदेत एक रहा आणि मतदानाच्यावेळी ज्यांच्या नावाचा व्हिप निघेल त्याला मतदानाचे आवाहन केले. (प्रतिनिधी)