शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

श्रीरामपूर मतदारसंघाच्या विकासासाठी विखेंशी मैैत्री-भानुदास मुरकुटे; कांबळेंच्या प्रचारार्थ राहुरीत सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 1:19 PM

सत्ता आणि हक्काच्या पाण्यापासून दुरावल्याने राहुरी कारखाना आणि तालुक्याची पीछेहाट झाली. बागायतदार शेतकºयांवर जिरायतदार होण्याची वेळ आली. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी मी व मंत्री राधाकृष्ण विखे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केली. 

श्रीरामपूर : सत्ता आणि हक्काच्या पाण्यापासून दुरावल्याने राहुरी कारखाना आणि तालुक्याची पीछेहाट झाली. बागायतदार शेतक-यांवर जिरायतदार होण्याची वेळ आली. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी मी व मंत्री राधाकृष्ण विखे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केली. शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ राहुरी तालुक्यातील मांजरी, टाकळीमियॉ, देवळालीप्रवरा व राहुरी फॅक्टरी येथे आयोजित जाहीर सभांमध्ये मुरकुटे बोलत होते. यावेळी लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मत धुमाळ, माजी सभापती सुनीता गायकवाड, अशोकचे संचालक अभिषेक खंडागळे, जि.प.सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, गणेश भाकरे  उपस्थित होते. मुरकुटे म्हणाले, राहुरी तालुक्यातील ३२ गावांमधील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. त्यासाठी आपल्या हक्काचा आणि सर्वसामान्य उमेदवार म्हणून कांबळे यांची निवड करण्यात आली. समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे या भागाचे वाटोळे झाले. उसाची शेती उदध्वस्त होऊन राहुरी कारखाना बंद पडला. त्याचा परिणाम देवळालीप्रवरा, राहुरी फॅक्टरी येथील बाजारपेठ ओस पडण्यात व कामगारांचे प्रपंचाची धूळधाण होण्यात झाला. विखे यांच्या प्रयत्नाने कारखाना सुरु झाला तरी पाटपाण्याच्या अशाश्वतेमुळे भवितव्य टांगणीवरच आहे. भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेस उमेदवार लहू कानडेंवर टीका केली. विखे व मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली काम करू. आपल्यावर विरोधक टीका करत आहेत. मात्र आमदारकीच्या काळात आपण भरीव विकास कामे केली. विकासासाठीच आपण सेनेसोबत आलो असून, येथील नेत्यांची भक्कम साथ आहे, असे ते म्हणाले. यावेळी किसनराव बडाख, अच्युतराव बडाख, निवृत्ती बडाख, गणपतराव कोल्हे, नामदेव बडाख, लक्ष्मण बडाख, ज्ञानेश्वर बडाख, दीपक बडाख, जालिंदर बडाख, हरिभाऊ बडाख उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019