शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

राहुरी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. विश्वनाथा यांना औरंगाबाद खंडपिठाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 5:45 PM

राज्याचे लक्ष वेधलेल्या राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या पदाला औरंगाबाद येथील खंडपिठात आव्हान देण्यात आले होते. न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमूर्ती ढवळे यांच्यापुढे दाखल करण्यात आलेले अपिल फेटाळण्यात आल्यामुळे कुलगुरूंना दिलासा मिळाला आहे.

राहुरी : राज्याचे लक्ष वेधलेल्या राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या पदाला औरंगाबाद येथील खंडपिठात आव्हान देण्यात आले होते. न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमूर्ती ढवळे यांच्यापुढे दाखल करण्यात आलेले अपिल फेटाळण्यात आल्यामुळे कुलगुरूंना दिलासा मिळाला आहे.कुलगुरू या पदासाठी डॉ. के. पी. विश्वनाथा हे अपात्र असल्याचे अपिल राहुरी येथील बाळासाहेब जाधव यांनी गेल्या वर्षी केले होते. महाराष्ट्र कषि विद्यापीठ अधिनियम-१९८३ नुसार कुलगुरू या पदासाठी डॉ. विश्वनाथा हे अपात्र असल्याचे अपिल करण्यात आले होते. कुलगुरूंना विभाग प्रमुख म्हणून पाच वर्षाचा अनुभव नसताना निवड करण्यात आल्याचे अपिलात म्हटले होते.महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूंची शिफारस शोध समितीच्या तज्ञांनी केली आहे. राज्यपालांनी निवड केली आहे. समितीने त्यावेळी संशय घेतला नव्हता. राज्यपालांनी त्यानंतर निवड जाहीर केली होती. त्यामुळे न्यायालयाने हे अपिल फेटाळून लावले आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यात येणार असल्याचे बाळासाहेब जाधव यांनी सांगितले. कुलगुरू विश्वनाथा यांच्या निवडीला येत्या ३१ डिसेंबरला दोन वर्ष पूर्ण होत आहेत.कुलगुरूंचा अनुभव पूर्ण नसल्याची तक्रार बाळासाहेब जाधव यांनी सुरूवातीला महाराष्ट्र शासनाकडे केली होती. शासनाने दखल न घेतल्याने औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल करण्यात आली होती. कुलगुरू के. पी. विश्वनाथा यांच्यावतीने अ‍ॅड. धोर्डे यांनी काम पाहिले. बाळासाहेब जाधव यांच्यावतीने अ‍ॅड. डी. एम. शहा यांनी काम पाहिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी