निळवंडेच्या कॅनॉलमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 03:37 PM2020-04-20T15:37:39+5:302020-04-20T15:42:18+5:30

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द शिवारातील जांभूळवाडी फाट्यावरील निळवंडेच्या कोरड्या कालव्यात अंदाजे ४० वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. रविवारी ( दि. १९ ) रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Unidentified Isma's body in a canal of blue | निळवंडेच्या कॅनॉलमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह

निळवंडेच्या कॅनॉलमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह

Next

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द शिवारातील जांभूळवाडी फाट्यावरील निळवंडेच्या कोरड्या कालव्यात अंदाजे ४० वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. रविवारी ( दि. १९ ) रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 वडझरी खुर्द शिवारातील जांभूळवाडी फाट्यावरील निळवंडेच्या कोरड्या कालव्यात अज्ञात इसमाचा मृतदेह असल्याची माहिती पोलीस पाटील नानासाहेब सुपेकर यांना मिळाली. श्री. सुपेकर यांनी याबाबत खात्री करून संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. परमेश्वर गायकवाड, लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी तातडीने घटनास्थळी येवून मृतदेह ताब्यात घेत संगमनेर येथे उत्तरीय तपासणीसाठी हलविला. मृताच्या नाकातून व डाव्या कानातून रक्त बाहेर आले होते. मृताच्या शरीरावर गुलाबी फुलबाहीचा शर्ट, शर्टचे आतुन पांढरे बनियान, बनियनचे आत निळे रंगाचा टी शर्ट, निळे रंगाची अंडरवेअर, निळ्या रंगाची फुल पॅन्ट असे मृताच्या पेहरावाचे वर्णन आहे. याप्रकरणी पोलीस पाटील नानासाहेब लक्ष्मण सुपेकर यांनी खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. लक्ष्मण औटी, हे. कॉ. बाबा खेडकर अधिक तपास करीत आहे. वरील वर्णनाच्या इसमाबाबत कुणाला काही माहिती असल्याचा संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी केले आहे.

Web Title: Unidentified Isma's body in a canal of blue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.