घरगुती सिलिंडर टाकीतून डिलिव्हरी बॉय चोरायचे दोन किलो गॅस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:22 AM2021-07-31T04:22:55+5:302021-07-31T04:22:55+5:30

भगवान गिरीधारीराम बिष्णोई (वय २३, रा. मूळ जोधपूर राजस्थान हल्ली रा. सिव्हिल हडको), भजनलाल जगदीश बिष्णोई (वय २१) व ...

Two kilos of gas to steal a delivery boy from a domestic cylinder tank | घरगुती सिलिंडर टाकीतून डिलिव्हरी बॉय चोरायचे दोन किलो गॅस

घरगुती सिलिंडर टाकीतून डिलिव्हरी बॉय चोरायचे दोन किलो गॅस

Next

भगवान गिरीधारीराम बिष्णोई (वय २३, रा. मूळ जोधपूर राजस्थान हल्ली रा. सिव्हिल हडको), भजनलाल जगदीश बिष्णोई (वय २१) व एक अल्पवयीन मुलगा अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. यातील भगवानराम बिष्णोई हा येथील कराचीवाला भारत गॅस एजन्सी येथे डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला होता. एजन्सीच्या गोडाऊनमधून ग्राहकांना देण्यासाठी टाक्या टेम्पोत भरल्यानंतर हा टेम्पो सिव्हिल हडको येथे आणायचा. येथे तिघे आरोपी प्रत्येक घरगुुती गॅस टाकीतून दोन किलो गॅस काढून तो व्यावसायिकांसाठी दिल्या जाणाऱ्या टाक्यांमध्ये भरायचे. ही बाब तोफखाना पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखेचे प्रमुख तथा पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांना समजली होती. त्यानंतर पथकाने सापळा लावून आरोपींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ४३ सिलिंडर, एक ॲपे रिक्षा, गॅस भरण्यासाठी वापरला जाणारा लोखंडी पाईप, दोन वजनी काटे, गॅस शेगडी, रेग्युलेटर असा एकूण ९३ हजार १७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरोधात उपनिरीक्षक मेढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक सुरज मेढे, हेड कॉन्स्टेबल शकील सय्यद, पोलीस नाईक अविनाश वाकचौरे, अहमद इनामदार, वसिम पठाण, शैलेश गोमसाळे, सचिन जगताप, अनिकेत आंधळे, अभिजित बोरुडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

---------------------

गरम पाणी टाकून सील पूर्ववत

भगवानराम बिष्णोई हा साथीदाराच्या मदतीने लोखंडी पाईपच्या सहाय्याने घरगुती वापराच्या सिलिंडरमधून गॅस काढून तो व्यावसायिक टाकीमध्ये भरायचे. त्यानंतर सिलिंडरच्या पॅकिंगवर गरम पाणी टाकून ते पूर्ववत सील करायचे. त्यामुळे ग्राहकांना संशय येत नव्हता. तसेच टाकीतून दोन किलो गॅस कमी झाल्यानंतर ग्राहकांच्या ही बाब निदर्शनास येत नव्हती. गेल्या अनेक दिवसांपासून गॅस चोरीचा हा उद्योग सुरू होता.

-----------------

पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

नगर शहरात अशा पद्धतीने अनेक ठिकाणी गॅसचा काळाबाजार होतो. यामध्ये ग्राहकांची फसवणूक तर होतेच मात्र ज्वलनशील पदार्थांचा हे चोरटे धोकादायक पद्धतीने वापर करतात. त्यामुळे ही बाब गंभीर आहे. याकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

...................

फोटो ३० आरोपी

घरगुती गॅस टाकीतून व्यवसायिक टाकीमध्ये कशा पद्धतीने गॅस भरला जायचा याचे प्रात्यक्षिक ताब्यात घेतलेल्या डिलिव्हरी बॉयने पोलिसांना करून दाखिवले.

Web Title: Two kilos of gas to steal a delivery boy from a domestic cylinder tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.