नगर-दौंड रोडवर अपघात, दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:19 PM2020-03-19T23:19:34+5:302020-03-19T23:20:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसापूर : नगर-दौंड रोडवर चिखली (ता. श्रीगोंदा) जवळ गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात वाहनाने मोटारसायकला धडक दिल्याने दोघे जण जागीच ठार झाले. सचिन दत्तात्रय बारगुजे(वय ४५ वर्षे) व अशोक पवार (वय ५० वर्षे, दोघे रा. घोटवी ता. श्रीगोंदा)अशी अपघातामधील मृतांची नावे आहेत.

Two killed in accident on Nagar-Daund Road | नगर-दौंड रोडवर अपघात, दोन ठार

नगर-दौंड रोडवर अपघात, दोन ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
विसापूर : नगर-दौंड रोडवर चिखली (ता. श्रीगोंदा) जवळ गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात वाहनाने मोटारसायकला धडक दिल्याने दोघे जण जागीच ठार झाले. सचिन दत्तात्रय बारगुजे(वय ४५ वर्षे) व अशोक पवार (वय ५० वर्षे, दोघे रा. घोटवी ता. श्रीगोंदा)अशी अपघातामधील मृतांची नावे आहेत.
दोन्ही युवक दुचाकीवरून नगरकडून घोटवी या त्यांच्या गावाकडे चालले होते. चिखलीनजीक अगरवाल कंपनीजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. त्यात ते दोघेही जागीच ठार झाले. चिखलीचे पोलीस पाटील बाळासाहेब लंके यांनी अपघाताची माहिती बेलवंडी पोलीसांना दिली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. बेलवंडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बजरंग गवळी पुढील तपास करत आहेत. 

Web Title: Two killed in accident on Nagar-Daund Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.