आज आणखी बारा रुग्णांची भर : नालेगावमध्ये चार रुग्ण, संगमनेर दोन, श्रीरामपूर दोन, पारनेर दोन, राहाता व दरेवाडीत एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:55 AM2020-06-25T11:55:07+5:302020-06-25T11:56:12+5:30

अहमदनगर : नगर शहरातील वाघ गल्ली येथील ४२ वर्षीय महिला, ४५ वर्षीय आणि ५० वर्षीय पुरुष तसेच १८ वर्षे युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. नगर शहरात चार आणि जिल्ह्यात आठ रुग्ण आढळून आले आहेत.

Twelve more patients added today: four in Nalegaon, two in Sangamner, two in Shrirampur, two in Parner, one in Rahata and Darewadi | आज आणखी बारा रुग्णांची भर : नालेगावमध्ये चार रुग्ण, संगमनेर दोन, श्रीरामपूर दोन, पारनेर दोन, राहाता व दरेवाडीत एक

आज आणखी बारा रुग्णांची भर : नालेगावमध्ये चार रुग्ण, संगमनेर दोन, श्रीरामपूर दोन, पारनेर दोन, राहाता व दरेवाडीत एक

googlenewsNext

अहमदनगर : नगर शहरातील वाघ गल्ली येथील ४२ वर्षीय महिला, ४५ वर्षीय आणि ५० वर्षीय पुरुष तसेच १८ वर्षे युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. नगर शहरात चार आणि जिल्ह्यात आठ रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोना बाधित रुग्ण हे सर्व रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. सुपा (पारनेर) येथील ५६ वर्षीय महिला कोरोना बाधीत आढळून आली आहे. 

आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. चंदनपुर (राहाता) येथील २४ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल झाला होता. 

संगमनेर शहरातील मोमीनपुरा भागातील ४६ वर्षीय पुरुष आणि नाईकवाडपुरा भागातील ५० वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आली आहे. तिला आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल केले होते. 

श्रीरामपूर येथील ५२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली होती. या व्यक्तीलाही आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. श्रीरामपूर  तालुक्यातील महांकाळ वडगाव येथील ७६ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आली आहे. 

ठाणे येथील ४० वर्षीय पुरुष कोरोना बाधित. मूळचा पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील असून मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. 

कळवा (मुंबई) येथील ४० वर्षीय पुरुष कोरोना बाधित झाला आहे. मूळचा दरेवाडी (नगर) येथील असून तो मुंबई पोलिस दलात कार्यरत. खडकवाडी येथील पोलिसासह ठाण्याहून हे दोघे एकत्र अहमदनगर येथे आले होते.

Web Title: Twelve more patients added today: four in Nalegaon, two in Sangamner, two in Shrirampur, two in Parner, one in Rahata and Darewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.