Truck - ST bus accident: 23 pilgrims injured in bus accident | ट्रक - एसटी बसचा अपघात : बसने घेतला पेट, 23 प्रवासी जखमी
ट्रक - एसटी बसचा अपघात : बसने घेतला पेट, 23 प्रवासी जखमी

अहमदनगर: औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघात झाल्यानंतर एसटी बसने पेट घेतल्यामुळे यात 23 प्रवासी जखमी झाले असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्रीनंतर दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.
बसमधील सुमारे 23 प्रवासी जखमी झाले आहेत. एसटी बस चालक आणि वाहक या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर बसने जागेवर पेट घेतला. आगीत बस पूर्ण जळून खाक झाली आहे. बस औरंगाबादवरून पुण्याला जात होती. त्याच वेळी नगरवरून औरंगाबादच्या दिशेने जाणा-या ट्रकने बसला समोरून धडक दिली. ट्रकची धडक एवढी जोरात होती की परिसरात मोठा आवाज झाला. बसमधील प्रवासी अपघाताच्या वेळी झोपेत होते. त्यामुळे नेमकं काय झालं हे प्रवाशांना समजलं नाही. बस चालकाच्या शेजारील भागात असलेले प्रवासी सर्वाधिक जखमी झाले आहेत. जखमींची नावे अद्याप समजलेली नाहीत.


Web Title: Truck - ST bus accident: 23 pilgrims injured in bus accident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.