शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

ट्रक-कार अपघातात अहमदनगरचे तीन ठार

By admin | Published: July 16, 2014 11:50 PM

कर्जत(जि. अहमदनगर) : पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण जवळील डाळज शिवारात मालट्रक-कार अपघातात अहमदनगरचे तिघे जागीच ठार, तर चौघे जखमी झाले.

कर्जत(जि. अहमदनगर) : पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण जवळील डाळज शिवारात मालट्रक-कार अपघातात अहमदनगरचे तिघे जागीच ठार, तर चौघे जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींवर इंदापूर, बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अहमदनगरचे पवार कुटुंब मंगळवारी रात्री सोलापूरकडून अहमदनगरला येत होते. रात्री ११़३० च्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील डाळज नं. २ शिवारात उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून कारने (क्र.एम. एच-१६-३९१५) जोराची धडक दिली. यामध्ये रामराव कृष्णराव पवार, आशालता रामराव पवार (रा. मिलन अपार्टमेंट, नवनाथनगर, अहमदनगर) हे पती-पत्नी आणि कारचालक मिलिंद भरत पवार (रा.समतानगर, अहमदनगर) जागीच ठार झाले. विलास कृष्णराव पवार, शारदा भरत पवार, वैशाली सुरेश पवार, सुरेश कृष्णराव पवार हे जखमी झाले आहेत. या अपघातासंदर्भात संतोष मच्छिंद्र जगताप यांनी भिगवन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. तिघांवर नगरमध्ये अंत्यसंस्कारअपघातामध्ये मृत्यू झालेल्या तिघांचे इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह सकाळी नगरमध्ये आणण्यात आले. सकाळी साडेदहा वाजता त्यांच्यावर नगरच्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पवार यांच्या निधनाने नगरच्या समतानगर भागात शोककळा पसरली. मयत रामराव पवार हे महात्मा फुले कृषी विद्यापीठातून रजिस्ट्रार या पदावरून निवृत्त झाले होते. तर आशालता या गृहिणी होत्या. मिलिंद पवार हे एका खासगी टॅ्रव्हल्सचे संचालक होते.