शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मराठा आरक्षणासाठी अकरा चौकांत रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 3:18 PM

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारविरोधात येत्या ९ आॅगस्ट रोजी शांततेच्या मार्गाने शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील ११ चौकांत रास्ता रोको करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारविरोधात येत्या ९ आॅगस्ट रोजी शांततेच्या मार्गाने शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील ११ चौकांत रास्ता रोको करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलन करण्यास रोखण्याचा प्रयत्न केल्यास स्वत: अटक करून घेऊन जेलभरो करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभर मराठा क्रांती जनआंदोलन करण्यात येणार आहे. नगर शहरासह जिल्ह्यात क्रांतीदिनी जनआंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या नियोजनासाठी सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत जोपर्यंत सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनाला गुरुवारी सकाळी ९़ ३० वाजता एकाच वेळी राष्ट्रगीताने सुरुवात केली जाईल. सकाळी राष्ट्रगीताने आंदोलनाची सुरुवात होणार असून, सरकारने सायंकाळपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन बेमुदत सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे समाज बांधवांनी सकाळी घरातून निघताना सोबत जेवणाचा डबा घेऊन यावे. तसेच जोपर्यंत समन्वयकांकडून जनआंदोलनाबाबत सूचना येत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवायचे नाही. पोलिसांनी बळाचा वापर करून रस्त्यावरून उठविण्याचा प्रयत्न केल्यास सर्व समाज बांधवांनी स्वत: ला अटक करून घ्यावी. जेलभरो करून तुरुंगातही आंदोलन सुरू ठेवले जाणार असून, आंदोलनाची आचारसंहिता न पाळणा-यांना समाज कोणतेही संरक्षण देणार नाही, असे बैठकीत ठरले.शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये बंद ठेवण्याची विनंती करणारयेत्या ९ आॅगस्ट रोजी मराठा जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये, खाजगी कार्यालये, दुकाने, बँका, सरकारी कार्यालये बंद ठेवण्याची विनंती केली जाणार आहे. रुग्णालये बंद न ठेवता रुग्णसेवा सुरू राहिल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.या चौकांत रास्ता रोकोमराठा समाजाच्या वतीने येत्या ९ आॅगस्ट रोजी निंबळक बायपास, बोल्हेगाव, एमआयडीसी चौक, प्रेमदान चौक, पत्रकार चौक, डीएसपी चौक, चांदणी चौक, यशपॅलेस, सक्कर चौक, अमरधाम रोड, केडगाव चौकांत रास्ता रोको करण्यात येणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा