श्रीरामपूर बाजार समितीत कांद्याच्या दरात काहीशी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:20 AM2021-05-07T04:20:48+5:302021-05-07T04:20:48+5:30

श्रीरामपूर : येथील बाजार समितीच्या कांदा बाजारात बुधवारी सुमारे ११ हजार ६३९ कांदा गोण्यांची आवक झाली. यावेळी झालेल्या लिलावात ...

Slight increase in onion prices in Shrirampur Bazar Samiti | श्रीरामपूर बाजार समितीत कांद्याच्या दरात काहीशी वाढ

श्रीरामपूर बाजार समितीत कांद्याच्या दरात काहीशी वाढ

Next

श्रीरामपूर : येथील बाजार समितीच्या कांदा बाजारात बुधवारी सुमारे ११ हजार ६३९ कांदा गोण्यांची आवक झाली. यावेळी झालेल्या लिलावात कांद्याचे भाव स्थिर राहिले.

लिलावामध्ये प्रथम श्रेणीचा कांदा ९५० ते १२५०, द्वितीय ७५० ते ९००, तृतीय ३०० ते ६५० व गोल्टी कांदा ४५० ते ८५० रुपये प्रति क्विंटलने विक्री झाला. कांद्याची आंध्र, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा या राज्यांमध्ये रवानगी होत आहे.

श्रीरामपूर येथे सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस कांदा मार्केटमध्ये लिलाव होतात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती संगीता शिंदे, उपसभापती नितीन भागडे व सचिव किशोर काळे यांनी केले आहे.

टाकळीभान उपबाजारात मंगळवारी तीन हजार ८७१ कांदा गोणींची आवक झाली. प्रथम श्रेणीचा कांदा १००० ते १२००, द्वितीय ७५० ते ९५०, तृतीय ३०० ते ६५० व गोल्टी कांदा ४०० ते ८०० प्रति क्विंटलने विक्री झाला.

Web Title: Slight increase in onion prices in Shrirampur Bazar Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.