सेवा करणे हे पुण्यकर्मच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:29 PM2019-09-08T12:29:09+5:302019-09-08T12:29:50+5:30

संत, महंतांची, गोरगरिबांची सेवा करणे हेच पुण्यप्राप्तीचे कारण आहे. संतांना जन्म देणा-या मातेला आधी वंदन करण्याची परंपरा आहे. सर्व प्राणीमात्राबद्दल वात्सल्याची भावना ठेवली तर प्राणीमात्र सुखी, आनंदी होतील.

Serving is a virtue | सेवा करणे हे पुण्यकर्मच

सेवा करणे हे पुण्यकर्मच

Next

सन्मतीवाणी
पुण्य कमविणे सोपे काम नाही. संत, महंतांची, गोरगरिबांची सेवा करणे हेच पुण्यप्राप्तीचे कारण आहे. संतांना जन्म देणा-या मातेला आधी वंदन करण्याची परंपरा आहे. सर्व प्राणीमात्राबद्दल वात्सल्याची भावना ठेवली तर प्राणीमात्र सुखी, आनंदी होतील.
    मनाचा संयम टिकविणे महत्त्वाचे आहे. धर्माची दलाली करा. चांगले फळ मिळेल. वैराग्य आणि त्यागवृत्ती बाळगणे खूप कठीण आहे. तीर्थकर बनण्यासाठी खूप कठोर तपश्चर्या करण्याची आवश्यकता असते. धर्म आराधना करतांना मनात व्याकुळता हवी. शुध्द सात्वीक भाव हवा. संयम ठेवा तरच धर्म आराधना सफल होईल. अध्यात्मात मन लागणे गरजेचे असते. मन स्थिर ठेवण्यासाठी उपासना करावीच लागते. आपण सर्व महावीरांचे संतान असून जैन धर्मानुसार आचरण करणे ही आपली जबाबदारी आहे. वेळ अनमोल आहे त्याचा सदुपयोग करुन घ्या. नाहीतर पश्चातापाची पाळी येईल. प्रत्येक पाऊल विचार करुनच टाकले पाहिजे. संतांचा आदर करण्याची वृत्ती ठेवा चांगल्या कामाकडे लक्ष द्यावे.
संतांच्या चरणाची धूळ मस्तकी लावावी म्हणजे आपण  वासनेपासून दूर राहू शकतो. संत सर्वांनाच समान मानतात. तप याचा अर्थ पुढीलप्रमाणे त म्हणजे तत्काळ, प म्हणजे पवित्र, जे तत्काळ पवित्र करते तेच तप होय. गुरुदेवांच्या विचारांचा आपल्या जीवनात समावेश करावा. धर्मस्थानात जी धर्म आराधना केली जाते तिला महत्त्व आहे. ती लवकर सफल होते. संतांच्या मुख्यातून धार्मिक कथा, प्रवचन ऐकण्याचे भाग्य लागते. परमेश्वर, संतांच्या बद्दल समर्पण वृत्ती ठेवा. भक्तीभाव ठेवा मन निश्चित स्थिर होईल.
    - पू. श्री. सन्मती महाराज

Web Title: Serving is a virtue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.