ज्येष्ठ नागरिक करताहेत स्मशानभूमीची नियमित स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:21 AM2021-05-14T04:21:42+5:302021-05-14T04:21:42+5:30

पिंपळगाव माळवी : ‍नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील काही ज्येष्ठ नागरिक विरंगुळा म्हणून गावातील अमरधाम येथील झाडाखाली गप्पा ...

Senior citizens do regular cleaning of the cemetery | ज्येष्ठ नागरिक करताहेत स्मशानभूमीची नियमित स्वच्छता

ज्येष्ठ नागरिक करताहेत स्मशानभूमीची नियमित स्वच्छता

Next

पिंपळगाव माळवी : ‍नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील काही ज्येष्ठ नागरिक विरंगुळा म्हणून गावातील अमरधाम येथील झाडाखाली गप्पा मारत बसायचे. त्यांच्या लक्षात आले की, या ठिकाणी बऱ्याचदा अंत्यविधीनंतर बराच कचरा तसाच साठला जातो व परिसरात अस्वच्छता निर्माण होते. त्यातून त्यांना अभिनव कल्पना सुचली व ते नियमित या परिसराची स्वच्छता ठेवू लागले.

पिंपळगाव माळवी येथे सीना नदीच्या कडेला गावची स्मशानभूमी असून त्याला संरक्षक भिंत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली आहे व पेव्हर ब्लॉक बसवलेले आहेत. या ठिकाणी एक बोअरवेल असून त्याला मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे हा परिसर निसर्गरम्य झाला आहे. येथील ज्येष्ठ नागरिक गंगाधर भागवत व मच्छिंद्र शिंदे हे दोघे जण येथील अमरधाममधील वृक्षांना नियमितपणे पाणी घालतात व परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ ठेवतात. सध्या कोरोना महामारीचा काळ असल्यामुळे अंत्यविधीलादेखील लोक जमत नाहीत, अशा परिस्थितीतही त्यांचे स्वच्छता अभियान नियमित चालू आहे.

या स्वच्छता अभियानात त्यांना जगन्नाथ जाधव, सुधीर प्रभुणे, सूर्यकांत काळे, रामभाऊ खांडके यांची मोलाची मदत झाली.

---

१३ पिंपळगाव माळवी

पिंपळगाव माळवी येथील स्मशानभूमीची स्वच्छता करताना ज्येष्ठ नागरिक.

Web Title: Senior citizens do regular cleaning of the cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.