शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

ढवळगाव शाळेला टाळे; पाचपुतेंच्या मध्यस्थीने उघडली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 5:02 PM

ढवळगाव : गटशिक्षणाधिका-यांनी सक्तीच्या रजेवर पाठविलेले शिक्षक पुन्हा शाळेत हजर झाल्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील जि प प्राथमिक शाळेला संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी पुन्हा टाळे ठोकले.कार्यपद्धतीवर आक्षेप घेत शाळेतील शिक्षक दौलत उगले यांना गटशिक्षणाधिकारी एन.बी.बोरुडे यांनी मध्यंतरी सक्तीच्या रजेवर पाठविले होते. परंतु ते पुन्हा शाळेत हजर झाले. त्यामुळे पालक व ...

ढवळगाव : गटशिक्षणाधिका-यांनी सक्तीच्या रजेवर पाठविलेले शिक्षक पुन्हा शाळेत हजर झाल्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील जि प प्राथमिक शाळेला संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी पुन्हा टाळे ठोकले.कार्यपद्धतीवर आक्षेप घेत शाळेतील शिक्षक दौलत उगले यांना गटशिक्षणाधिकारी एन.बी.बोरुडे यांनी मध्यंतरी सक्तीच्या रजेवर पाठविले होते. परंतु ते पुन्हा शाळेत हजर झाले. त्यामुळे पालक व ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी शाळेला टाळे ठोकून रोष व्यक्त केला. दरम्यान, माजी मंत्री बबनराव पाचपुते व शिक्षक संघटनांनी मध्यस्थी करुन ग्रामस्थांना आंदोलन मागे घेण्यास प्रवृत्त केले. शिक्षक उगले यांनी आपल्या सर्व चुका मान्य करून तशी माफी मागून माफीनामा ग्रामस्थांना लिहून दिल्यानंतर ग्रामस्थांनी अधिकारी व पाचपुते यांच्या उपस्थितीत वर्ग उघडून दिले. दरम्यान, त्यानंतर पाचपुते व गट शिक्षणाधिका-यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी रमेश ठुबे, रवींद्र शहाणे, प्रवीण ठुबे,सचिन कातोरे, मुख्याध्यापक सातपुते,माणिक ढवळे, उपसरपंच अजय वाळुंज, मच्छिंद्र डोंगरे, बाबासाहेब शिंदे, गौतम वाळुंज, तसेच पालक व मान्यवर उपस्थित होते.

शिक्षकाची दिलगिरी

माझ्या बोलण्यामुळे किंवा वर्तणुकीमुळे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफी मागतो. तसेच यापुढे अशी चूक होणार नाही अशी ग्वाही देतो, असे शिक्षक दौलत उगले यांनी माफीनाम्यात म्हटले आहे.

टॅग्स :Ahmadnagarअहमदनगरeducationशैक्षणिक