नामांतराबाबत नगर जिल्ह्यात राजकीय पक्षांची भूमिका गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:03 AM2021-01-08T05:03:15+5:302021-01-08T05:03:15+5:30

---- बाळासाहेब ठाकरे यांचाच होता आदेश १९९५ मध्ये युतीची सत्ता आल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नगरला जाहीर सभा झाली ...

The role of political parties in the Nagar district regarding the renaming | नामांतराबाबत नगर जिल्ह्यात राजकीय पक्षांची भूमिका गुलदस्त्यात

नामांतराबाबत नगर जिल्ह्यात राजकीय पक्षांची भूमिका गुलदस्त्यात

Next

----

बाळासाहेब ठाकरे यांचाच होता आदेश

१९९५ मध्ये युतीची सत्ता आल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नगरला जाहीर सभा झाली होती. या सभेत ठाकरे यांनी अहमदनगरचे नाव अंबिकानगर करा, असा आदेशच दिला होता. मात्र तत्कालीन सरकारने त्यावर कार्यवाही झाली नाही. आताही राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. जिल्ह्यात शंकरराव गडाख हे शिवसेनेचे मंत्री आहेत. त्यांनीही अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.

---------------

अहमदनगर ते अंबिकानगर

२८ मे १४९० मध्ये अहमद निजामशहा याने भुईकोट किल्ल्याच्या उभारणीस सुरवात करून शहर वसवले. त्यावरून या शहराला अहमदनगर असे नाव पडले. तर नगर शहरातील केडगाव भागात अंबिका देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. त्यावरून शिवसेनेने शहराचे नाव अंबिकानगर असावे, अशी मागणी केली आहे.

Web Title: The role of political parties in the Nagar district regarding the renaming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.