वसुली लिपिकांकडे नाही थकबाकीदारांची यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:18 AM2021-01-14T04:18:44+5:302021-01-14T04:18:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कर वसुली मोहिमेचा पहिला टप्पा थकबाकीदारांची यादी तयार करण्याचा असतो. महापालिकेची थकबाकी वसूल करण्यासाठी ...

The recovery clerk does not have a list of arrears | वसुली लिपिकांकडे नाही थकबाकीदारांची यादी

वसुली लिपिकांकडे नाही थकबाकीदारांची यादी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कर वसुली मोहिमेचा पहिला टप्पा थकबाकीदारांची यादी तयार करण्याचा असतो. महापालिकेची थकबाकी वसूल करण्यासाठी नेमलेल्या लपिकांकडे मात्र थकबाकीदारांची यादीच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे थकबाकीदारांची यादी नसेल तर वसुली करणार कशी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

महापालिकेचे उपायुक्त संतोष लांडगे यांनी बुरुडगाव प्रभाग समिती कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी कर वसुली करणाऱ्या लिपिकांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे थकबाकीदारांची यादी आढळून आली नाही. थकबाकीदारांची यादी कुठे आहे, असा प्रश्न लांडगे यांनी केला. त्यावर थकबाकीदारांची यादी नाही पाहतो, असे उत्तर मिळाले. वसुलीसाठी बाहेर पडतानाच कर्मचाऱ्यांकडे थकबाकीदारांची यादी असणे आवश्यक आहे. परंतु, लिपिकांकडेच यादी नसल्याने ते वसुली कशी करतात, हा प्रश्नच आहे. तसेच बुरुडगाव प्रभागातील एकूण १२ लिपिक वेळेवर न आल्याने त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. सावेडी प्रभाग समिती कार्यालयालाही लांडगे यांनी अचानक भेट देऊन वसुलीचा आढावा घेतला. यावेळी २२ लिपिक हजर नसल्याचे आढळून आले. त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शास्तीत सूट दिली. त्यामुळे मागील दोन महिन्यांत वसुलीचा आकडा वाढला. दररोज १५ ते २० लाखांचा भरणा होत होता. मात्र, शास्तीच्या सवलतीची मुदत संपलयाने वसुली मोहीम थंडावली आहे.. सध्या दररोज ४ ते ५ लाखांचा भरणा होत आहे. यावरून प्रभाग समिती कार्यालयांकडून वसुलीचे नियोजन होत नसल्याचे समोर आले आहे.

....

सातवा वेतन आयोगासाठी उत्पन्नाची अट

नगरविकास विभागाने महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा आदेश दिला आहे. मात्र,त्यासाठी उत्पन्नवाढीची अट टाकण्यात आली आहे. कर वसुली थंडावल्याने महापालिकेचे उत्पन्नात मोठी घटले आहे. महापालिकेचे उत्पन्न न वाढल्यास सावता वेतन आयोग लागू करण्यातही अडचणी येण्याची शक्यता आहे.

Web Title: The recovery clerk does not have a list of arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.