डाकपालने केला चाळीस हजारांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:21 AM2020-12-22T04:21:13+5:302020-12-22T04:21:13+5:30

कोपरगाव (जि. अहमदनगर) : खातेदारांनी पोस्टात भरणा करण्यासाठी दिलेली रक्कम खात्यात जमा न करणे, खातेदाराच्या खात्यातील रक्कम बनावट सह्या ...

The postman embezzled forty thousand | डाकपालने केला चाळीस हजारांचा अपहार

डाकपालने केला चाळीस हजारांचा अपहार

Next

कोपरगाव (जि. अहमदनगर) : खातेदारांनी पोस्टात भरणा करण्यासाठी दिलेली रक्कम खात्यात जमा न करणे, खातेदाराच्या खात्यातील रक्कम बनावट सह्या करून काढून स्वतःच्या फायद्यासाठी वापरून डाकपालने सुमारे ४० हजार २०० रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हा प्रकार भारतीय डाक विभागाच्या धारणगाव शाखेत (डाकघर) घडला आहे. याप्रकरणी कोपरगाव उपविभागाचे डाक निररक्षक विनायक सोन्याबापू शिंदे (रा. नाऊर, ता. श्रीरामपूर) यांनी धारणगाव पोस्टातील डाकपाल रवींद्र बाळासाहेब जाधव (वय २८, रा. बोलकी, पोस्ट करंजी ता. कोपरगाव) यांच्याविरुद्ध सोमवारी (दि.२१) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जाधव हा १ मार्च २०१४ पासून धारणगाव शाखेत डाकपाल म्हणून कार्यरत होता. कोपरगाव उपविभागाचे डाक निरीक्षक विनायक शिंदे यांनी धारणगाव पोस्टातील खातेदारांच्या पासबुकची १२ ऑक्टोबर २०१९ रोजी तपासणी केली असता त्यात अनियमितता आढळून आली. त्यात सर्व खातेदारांचे बचत खाते, ठेव खात्यासह इतरही खात्यांचे पासबुक तपासले असता खातेदारांनी त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी वेळोवेळी दिलेली रक्कम जाधव याने स्वीकारली. परंतु, ती जमा न करता स्वतः वापरली आहे. तसेच काही बचत खातेदारांच्या खात्यामधून पैसे काढण्याचा बोगस फॉर्म स्वतः तयार करून त्यावर खातेदाराचे बनावट हस्ताक्षर करून खातेदारांच्या अपरोक्ष परस्पर ४० हजार २०० रुपयांची रक्कम काढून खातेदाराची व पोस्ट खात्याची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे करीत आहेत.

Web Title: The postman embezzled forty thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.