शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

राहुरीत एटीएम फोडून १५ लाख लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 1:45 PM

राहुरी : येथील बस स्थानकासमोरील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी सोमवारी पहाटे सुमारे १५ लाख रुपये लांबविल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नेमलेला नव्हता़ तसेच एटीएममध्ये सीसीटीव्ही बसविलेला नाही.रविवारी पहाटे याच बस स्थानकाशेजारील आईस्क्रीमच्या दुकानाबाहेरील सीसीटीव्ही चोरट्यांनी काढून नेला होता. एटीएमची पाहणी करुन चोरटे त्यादिवशी निघून गेले. सोमवारी ते चोरटे ...

राहुरी : येथील बस स्थानकासमोरील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी सोमवारी पहाटे सुमारे १५ लाख रुपये लांबविल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नेमलेला नव्हता़ तसेच एटीएममध्ये सीसीटीव्ही बसविलेला नाही.रविवारी पहाटे याच बस स्थानकाशेजारील आईस्क्रीमच्या दुकानाबाहेरील सीसीटीव्ही चोरट्यांनी काढून नेला होता. एटीएमची पाहणी करुन चोरटे त्यादिवशी निघून गेले. सोमवारी ते चोरटे पुन्हा आले़ त्यांनी नगर-मनमाड रोडवर चारचाकी कार लावली़ तेथून चोरटे पायी बसस्थानकावर आले. समोरच असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएममध्ये चोरटे घुसले़ हे एटीएम चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने कापले. आतील पैशाचा ट्रे घेऊन चोरटे पसार झाले. हे एटीएम कापतात ते शॉर्टसर्कीटमुळे जळाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या एटीएममध्ये सुमारे १५ लाख रुपये रक्कम असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.दरम्यान या एटीएमपासूनच काही अंतरावर असलेल्या हॉटेलच्या कॅमेºयात हे चोरटे कैद झाले आहेत. त्यात चोरटे १ वाजून ३६ मिनिटांनी राहुरीतील नगर-मनमाड रस्त्यावर कार लावताना दिसत आहेत. कारमध्ये एक ड्रायव्हर बसलेला दिसत असून, इतर तिघेजण एटीएमच्या दिशेने येतात दिसतात. त्यांच्या हातात कटरसारखे काहीतरी असल्याचे दिसते. मात्र, सीसीटीव्ही व चोरट्यांमधील अंतर जास्त असल्यामुळे या सीसीटीव्हीत चोरट्यांचे चेहरे स्पष्टपणे ओळखू येत नाहीत, असे पोलिसांनी सांगितले़ घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधीकारी अरुण जगताप, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक एल टी भोसले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली़ श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते़ मात्र, श्वान पथकाला चोरट्यांचा माग काढता आला नाही.

टॅग्स :AhmadnagarअहमदनगरCrimeगुन्हाatmएटीएम