शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अ‍ॅट्रॉसिटीसाठी कार्यकर्त्यांचे अर्धनग्न आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 4:40 PM

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालासंदर्भात तथागत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न होऊन आंदोलन करत कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

अहमदनगर : अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालासंदर्भात तथागत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न होऊन आंदोलन करत कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली.या आंदोलनात प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशांत म्हस्के यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला त्वरित अटक करू नये, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी अशा स्वरूपाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आम्ही न्यायालयाचा आदर करतो मात्र या निर्णयामुळे दलितांवर अत्याचाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. राज्य व देशात गेल्या २० वर्षात किती गुन्हे अ‍ॅट्रॉसिटीतंर्गत दाखल झाले, यामध्ये किती गुन्ह्यांचा निकाल लागला व किती गुन्हे खोटे निघाले याची श्वेतपत्रिका काढावी. यातून सत्य बाहेर येईल. भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात समता प्रस्थापित करण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची तरतूद केली आहे. दलितांसाठी असलेल्या अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. अर्धनग्न होऊन गळ्यात मडके व हातात झाडू घेऊन यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली.या आंदोलनात सुशील म्हस्के, आशिष गायकवाड, तेजस गायकवाड, विनोद पाडळे, दीपक गायकवाड, हर्षद पेंढारकर, चेतन ढगे, सागर ढगे, मंगेश गायकवाड, हर्षद शिर्के, सुरेश काळे, महेश शेळके आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय