शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

निलेश लंके यांचा आमदारकीचा राजीनामा, अहमदनगरमधून लोकसभा लढवणार

By चंद्रकांत शेळके | Published: March 29, 2024 7:57 PM

राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी लंके यांना रडू कोसळले.

चंद्रकांत शेळके/अहमदनगर: पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांना आपण आजच राजीनामा पाठवत असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

लंके यांनी शुक्रवारी सायंकाळी सुपा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला संबोधताना त्यांनी विखे पाटील यांच्यावर कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष टीका केली. विखे यांनी आपल्यावरील रागापोटी पारनेरची सर्व कामे अडवली. त्यांनी मतदारसंघात दहशत निर्माण केली आहे. या दहशतीला पायबंद घालण्यासाठी आपण मैदानात उतरलो असल्याचे लंके म्हणाले.

राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी लंके यांना रडू कोसळले. जनतेने आपणाला निवडून दिले. पण ही लढाई लढण्यासाठी मुदतपू्र्व राजीनामा देण्याची वेळ आली. आपण शरद पवारांना लोकसभा लढविण्याचा शब्द दिला होता. मधल्या वाईट काळात शरद पवारांना साथ देऊ शकलो नाही याचे दु:ख आहे. ती भरपाई करण्यासाठी आपण राजीनामा देत आहोत. मुंबईत हा राजीनामा अध्यक्षांना आजच पोहोच होईल. तसेच मेलवरही पाठवत आहोत, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AhmednagarअहमदनगरPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवार