मनपात शिवसेनेकडून राष्ट्रवादीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:26 AM2021-02-25T04:26:47+5:302021-02-25T04:26:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: महापालिका स्थायी समिती सभापती पदावर राष्ट्रवादीने दावा केला असला तरी शिवसेनेही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी ...

NCP's dilemma from Shiv Sena in Manpat | मनपात शिवसेनेकडून राष्ट्रवादीची कोंडी

मनपात शिवसेनेकडून राष्ट्रवादीची कोंडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: महापालिका स्थायी समिती सभापती पदावर राष्ट्रवादीने दावा केला असला तरी शिवसेनेही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे यावेळीही शिवसेनेकडून राष्ट्रवादीची कोंडी केली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी येत्या ४ मार्च रोजी निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांच्या नावाची चर्चा आहे. सभापती पदासाठी राषट्रवादीतच रस्सीखेच हाेती. अखेर घुले यांच्या नावावर एकमत झाले. राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी घडत असताना हाताची घडी तोंडावर बोट, अशीच काही भूमिका सेना व भाजपकडून घेतली गेली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मात्र सेनेच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपकडून मात्र कुणीही इच्छुक नाही, असे नाही. पण, पक्षाकडून याबाबत कोणताही आदेश अजून तरी आलेला नाही. सेनेने मात्र सदस्यांची बैठक घेऊन उमेदवार देण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. सभापती पदासाठीचा उमेदवार लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे सेनेच्या गटातून सांगण्यात आले. तसेच याबाबत वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात महाविकास आघाडी असली तरी महापालिकेत राष्ट्रवादीने भाजपशी जुळवून घेतले. त्यामुळे सेनेला सत्तेपासून दूर राहावे लागले. महापालिकेत क्रमांक एकचा पक्ष असूनही सेनेला अडीच वर्षात एकही पद मिळाले नाही. अगदी विरोधी पक्षनेतेदेखील राष्ट्रवादीकडेच आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या स्थायी सभापती पदाच्या निवडणूकीतूनही सेनेला एनवेळी माघार घ्यावी लागली. सभापती पदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सेनेने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. सेनेने उमेदवार दिल्यास राष्ट्रवादीच्या घुले यांची अडचण होणार आहे. स्थायी समितीत राष्ट्रवादीकडे पाच सदस्य आहेत. महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीला ताकत देईल. दोघांचे मिळून ९ सदस्य होतात. त्यामुळे सेनेचे गणित जुळणे कठीण आहे. त्यासाठी सेनेच्या स्थानिक नेत्यांना वरिष्ठांशी बोलावे लागेल. मागीलवेळी सेनेने माघार घेतली होती. यावेळी राष्ट्रवादीने माघार घेऊन सेनेला पाठिंबा द्यावा, असा एक मतप्रवाह आहे.

...

वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाकडे लक्ष

चार महिन्यांपूर्वी झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीचा वाद पक्षीय पातळीवर सोडविण्यात आला होता. सेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी बैठक होऊन सेनेने माघार घेतली होती. येत्या ४ मार्च रोजी होणाऱ्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी सेनेने तयारी सुरू केल्याने यावेळी वरिष्ठांकडूनच निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. सेना व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: NCP's dilemma from Shiv Sena in Manpat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.