लॉकडाऊन नावालाच: बारामध्ये उशिरापर्यंत झिंगाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:10 AM2021-01-24T04:10:45+5:302021-01-24T04:10:45+5:30

अरुण वाघमोडे अहमदनगर: कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कायम असल्याने शासनाने परमिट रूम, वाइन शॉप व देशी दारू दुकानांना वेळेच बंधन ...

The name of the lockdown itself: Zingat until late at twelve | लॉकडाऊन नावालाच: बारामध्ये उशिरापर्यंत झिंगाट

लॉकडाऊन नावालाच: बारामध्ये उशिरापर्यंत झिंगाट

Next

अरुण वाघमोडे

अहमदनगर: कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कायम असल्याने शासनाने परमिट रूम, वाइन शॉप व देशी दारू दुकानांना वेळेच बंधन देत नियमांचे पालन करण्याचे आदेश दिलेले आहेत. प्रत्यक्षात मात्र हॉटेल, बारमध्ये नियमांना तिलांजली देत रात्री उशिरापर्यंत झिंगाट सुरू असल्याचे ‘लोकमत’ने २१ व २२ जानेवारीदरम्यान केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही नियम, अटी व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून बिअर बार, वाइन शॉप, बिअर शॉपी व देशी दारू दुकांने ५ ऑक्टोबर २०२० पासून सुरू ठेेवण्यास परवानगी दिली आहे. बिअर बार, वाइन शॉप सकाळी ११.३० ते रात्री १०, बिअर शॉपी सकाळी १० ते रात्री १० तर देशी दारूचे दुकान सकाळी ९ ते रात्री १० अशी वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. शहरातील व शहराबाहेरील

परमीट रुम्स हॉटेल व काही वाइन शॉपची पाहणी केली असता काहींनी वेळेवर तर काहींनी बाहेरून दरवाजा बंद करून आतून दुकाने सुरू ठेवल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे नगर-औरंगाबाद, नगर-मनमाड व नगर-पुणे व कल्याण रोडवरील बहुतांशी हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्ट्या रंगल्याचे निदर्शनास आले. बिअरबारचा मुख्य दरवाजा बंद करून मागच्या दरवाजाने ग्राहकांना आत घेण्याचे प्रकार सुरू होते. उत्पादन शुल्क विभाग आणि रात्री पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस पथकाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले.

शहरातील हॉटेल बिधास्त सुरू

शहरातील माळीवाडा बसस्थानक व सावेडी परिसरातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या हॉटेलमध्ये तर रात्री दहानंतर गर्दी वाढत असल्याचे दिसून आले. साडेदहानंतर हॉटेलचे मुख्य दरवाजे बंद करून घेतल्यानंतर आतमध्ये उशिरापर्यंत झिंगाट सुरू होते.

.................

शहराबाहेरही तिची स्थिती

नगर-औरंगाबाद रोड व नगर-पुणे रोडवर केडगावपासून पुढे अनेक बिअरबार असलेले हॉटेल आहेत. या हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत जेवण व दारूची विक्री हाेत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे रस्त्यावर स्टॉल मांडून खाद्यपदार्थ विक्री करणारे व्यावसायिकही दारू विकताना दिसून आले.

काय आहेत आदेश?

शासनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला ५ ऑक्टोबर २०२० रोजी आदेश जारी करत बिअर बार, वाइन शॉप व देशी दारू विक्रीबाबत वेळ निश्चित करून दिलेली आहे. कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात लागू केलेल्या नियमांचा भंग केल्यास नियमानुसार कारवाई कदण्याचे आदेश दिलेले आहेत.

वाइन शॉप- ४२

देशी दारू दुकाने-१४९

परमिट रुम-६५६

बिअर शॉपी- १०२

दारू विक्री करणाऱ्या परवानाधारकांची उत्पादन शुल्क विभागाकडून नियमित तपासणी सुरू आहे. तपासणीदरम्यान कुणी नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

- गणेश पाटील, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर

Web Title: The name of the lockdown itself: Zingat until late at twelve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.