शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

नगर मनपा निवडणूक २०१८ : भाजप उमेदवारांच्या याचिकेवर उद्या सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 2:16 PM

महापालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्ज छाननीत बाद झाल्यानंतर खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा व सुनेसह चौघांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.

अहमदनगर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्ज छाननीत बाद झाल्यानंतर खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा व सुनेसह चौघांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने चौघांची याचिका दाखल करून घेतली असून त्यावर सोमवारी (दि. २६) सुनावणी होणार आहे.महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या चार उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले होते. त्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पहाटे दिला होता. खा. दिलीप गांधी यांच्या बंगल्याचे अतिक्रमण आडवे आल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला. त्यामुळे गांधीसह चौघा भाजप उमेदवारांनी त्यांच्या वकिलांमार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. यावेळी अ‍ॅड. नितीन गवारे यांनी चौघांची बाजू मांडली. निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवण्याबाबत गवारे यांनी आक्षेप घेतला. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे वकीलांनाही त्यांची बाजू मांडण्याचे खंडपीठाने निर्देश दिले. दरम्यान शिवसेनेचे उमेदवार गिरीश जाधव यांनी आधीच खंडपीठात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे त्यांचीही बाजू ऐकून घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच याचिकेवर निर्णय होणार आहे. दरम्यान संबंधित हरकतदारांनाही खंडपीठाने सुनावणीच्यावेळी हजर राहण्याचा आदेश बजावला आहे. अर्ज बाद करण्याबाबतचे सर्व रेकॉर्ड सादर करण्याचा आदेशही आयोगाच्या वकिलांना यावेळी देण्यात आला.याचिकाकर्त्यांची याचिका सकाळी १०.३० वाजता दाखल करून घेतली. त्यावर वकिलांनी २.५० वाजता बाजू मांडली. या याचिकेवरील सुनावणी सोमवारी होणार आहे...तर सदस्य झाल्यानंतर अपात्रअनाधिकृत बांधकाम करणारा किंवा त्या जागेत राहणारा, त्या मालमत्तेचा वारसदार पालिकेचा सदस्य म्हणून अनर्ह ठरतो, असे कायद्यात सांगितले आहे. मात्र संबंधित उमेदवार अद्याप सदस्य झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या अधिकारावर बाधा येते, असा युक्तिवाद होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.चिपाडे यांचीही याचिकाप्रभाग ८ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. योगेश चिपाडे यांच्या मालमत्तेवरील थकबाकीमुळे त्यांचा अर्ज बाद झाला होता. विशाल खोटे या प्रभाग ८ मधील एकमेव उमेद्वाराने चिपाडे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यांनीही शनिवारी खंडपीठात अ‍ॅड. होन यांच्यामार्फत याचिका दाखल केली. त्यावरही सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांच्या निकालाकडेही शहराचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका