शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

नगर मनपा निवडणूक २०१८ : मतदार यादीत २० तारखेपर्यंत दुरुस्ती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:51 AM

एखाद्या मतदाराचा पत्ता एका प्रभागात असेल आणि त्याचे नाव दुसऱ्या प्रभागात गेले असेल तर अशा मतदारांबाबत बदल करता येतो

अहमदनगर : एखाद्या मतदाराचा पत्ता एका प्रभागात असेल आणि त्याचे नाव दुसऱ्या प्रभागात गेले असेल तर अशा मतदारांबाबत बदल करता येतो. अशी दुरुस्ती किंवा बदल महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत करता येतो, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी दिली.राज्य निवडणूक आयोगातर्फे माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आयोगाचे प्रसिद्धी अधिकारी जगदीश मोरे, महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार, डॉ. प्रदीप पठारे, प्रसिद्धी अधिकारी मिलिंद वैद्य उपस्थित होते.या कार्यशाळेत बोलताना चन्ने म्हणाले, विधानसभेची यादी विभाजन करूनच प्रभागनिहाय यादी तयार करण्यात येते. विधानसभा यादीमध्येच मतदाराचे नाव नसेल तर ते महापालिकेच्या प्रभाग यादीत येणे शक्य नाही. विधानसभेच्या यादीत नाव असेल आणि महापालिकेसाठी कोणत्याही प्रभागाच्या यादीत नाव नसेल तर असे नाव अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदार यादीत समाविष्ट करता येईल. पत्ता ज्या प्रभागात आहे, त्या प्रभागातील यादीत नाव नसेल, तर अशाही नावांमध्ये बदल करता येतो.इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अफवा पसरविल्या जातात. प्रत्यक्षात मात्र मशिन्स्ना मोठ्या प्रमाणावर सुरक्षा असते. मशिनमध्ये उमेदवारांची नावे समाविष्ट करताना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाते. मतदानाची टक्केवारी वाढविण्याबाबत आयोग जागृती करणार आहे.नागरिकांच्या आयुष्यावर परिणाम करणारी स्थानिक स्वराज्य संस्था ही सर्वात जवळची संस्था आहे, त्यामुळे अशा संस्थेच्या निवडणुकीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले पाहिजे. लोकसभा, विधानसभा आणि नगरसेवक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी सारखेच कागदपत्रे लागतात, असे काही नाही, असे चन्ने यांनी स्पष्ट केले.आॅनलाईन अर्जांची कटकटसध्या आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी सात ते आठ तास वेळ द्यावा लागत आहे. प्रत्यक्ष अर्ज सादर करायचे असताना आॅनलाईन अर्जांची अट उमेदवारांना किचकट वाटत आहे, या माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नावर चन्ने म्हणाले, आॅनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे राज्य निवडणूक आयोगाकडे उमेद्वारांचा डाटा एकत्रित उपलब्ध होतो. असा डाटा सन २००० पूर्वी यंत्रणेअभावी करणे शक्य नव्हते. असा डाटा आयोगाकडे ठेवण्यासाठीच आॅनलाईन अर्जांची अट घालण्यात आली आहे. मात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. परवानगी घेऊनच उमेदवारांनी प्रचार करावा. प्रचारासाठी सार्वजनिक जागा आधी मागेल त्यालाच प्राधान्यक्रमानुसार परवानगी दिली जाईल, असे चन्ने म्हणालेजाहिरात प्रकाशितबाबत समान नियम प्रस्तावित लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला अगदी मतदानाच्या दिवशीही वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करता येते. मात्र महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ४८ तास आधीच प्रचार संपतो. प्रचार संपल्याच्या मुदतीनंतर उमेदवाराला वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देता येत नाही. त्यामुळे सर्वच निवडणुकीसाठी प्रचाराची मुदत आणि जाहिरात प्रसिद्धीबाबत समान नियम करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे चन्ना यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका