शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अतिक्रमण हटविणाºया अधिकाºयाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 7:58 PM

महापालिका कर्मचाºयांचे आंदोलन : व्हीडिओ शुटिंग पाहून गुन्हा दाखल करणार

अहमदनगर : प्रेमदान चौकातील रुग्णालयाचे अनाधिकृत बांधकाम पाडताना महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांना काही तरुणांनी शिविगाळ करून धक्काबुक्की केली. त्यानंतर कामगार युनियनने अधिकारी व कर्मचाºयांसह रुग्णालयासमोरच ठिय्या दिला. व्हीडिओ शुटिंग तपासून गुन्हा दाखल करण्याचा आदेश आयुक्त घनश्याम मंगळे यांनी सायंकाळी युनियनसोबत झालेल्या बैठकीत दिला.उच्च न्यायालयाच्या आदेशाने आतापर्यंत १७ रुग्णालयांच्या पार्किंगमधील अनाधिकृत बांधकामावर हातोडा टाकला. पहिल्या टप्प्यातील ५२ रुग्णालयांवरील कारवाईचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला. प्रेमदान चौकातील डॉ. प्रदीप तुपेरे यांचे नवजीवन सर्जिकल अ‍ॅण्ड क्लिनिक हॉस्पिटलच्या पार्किंगच्या जागेतील बाह्यरुग्ण विभाग आणि वेटिंग रुमवर अतिक्रमण विरोधी पथकाने सकाळी हातोडा टाकला. रुग्णालयाच्या बाहेरील अनाधिकृत भाग तोडत असतानाच तेथे काही तरुणांनी सुरेश इथापे व त्यांच्या सहकाºयांसोबत हुज्जत घातली. यावेळी इथापे यांना धक्काबुक्की व शिविगाळ झाली. एकाने इथापे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अन्य एका रुग्णालयावर कारवाईसाठी जातानाही इथापे व काही तरुणांचे वाद झाले.या घटनेनंतर काही क्षणातच तेथे कामगार युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड अनंत लोखंडे, विजय बोधे यांच्यासह अन्य कर्मचारी आले. त्यांनी रुग्णालयासमोरच ठिय्या दिला. यावेळीही लोखंडे व तेथे उपस्थित असलेल्या दोघे यांच्यात वाद झाले. डॉ. तुपेरे यांनीच गुंडांकडून इथापे यांना शिविगाळ, धक्काबुक्की केली. त्यामुळे डॉ. तुपेरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांचा वैद्यकीय परवाना तत्काळ रद्द करावा, अशी मागणी करून लोखंडे यांनी रुग्णालयाच्या दारातच ठिय्या दिला. या आंदोलनात नगररचना विभागाचे सहायक संचालक संतोष धोंगडे, कल्याण बल्लाळ आदी सहभागी झाले. मारहाण करणाºयांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, डॉ. तुपेरे यांचा वैद्यकीय परवाना तत्काळ रद्द करावा, पोलिस बंदोबस्त दिल्याशिवाय अतिक्रमणविरोधी कारवाई होणार नाही, असा निर्धार लोखंडे यांनी केला. त्यानंतर आयुक्त घनश्याम मंगळे, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांनी कामगारांशी चर्चा केली. दुपारी साडेचारवाजता बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने कामगारांनी सुरू केलेले रुग्णालयासमोरील आंदोलन मागे घेतले. ----------------