बँकेचा कारभार काटेकोरपणे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:24 AM2021-03-09T04:24:22+5:302021-03-09T04:24:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा राज्यभर मोठा लौकिक आहे. बँकेच्या कारभाराची सूत्रे आपल्या हाती दिली ...

Manage the bank strictly | बँकेचा कारभार काटेकोरपणे करा

बँकेचा कारभार काटेकोरपणे करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा राज्यभर मोठा लौकिक आहे. बँकेच्या कारभाराची सूत्रे आपल्या हाती दिली असून, बँकेचा कारभार महानगर बँकेप्रमाणे काटेकाेरपणे करा, असा सल्ला ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी अध्यक्ष ॲड. उदय शेळके यांना सोमवारी दिला.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची त्यांच्या नगर येथील निवासस्थानी भेट घेतली. गडाख यांनी शेळके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी गडाख म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आशिया खंडातील नावाजलेली बँक आहे.सहकारी चळवळीमध्ये व जिल्ह्याच्या आर्थिक विकासामध्ये जिल्हा बँकेचे मोठे योगदान आहे. देशाचे नेते शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तुमच्याकडे बँकेची सूत्रे सोपविली आहेत. महानगर सहकारी बँक आपण अतिशय उत्तम प्रकारे चालवली. या अनुभवाचा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज करताना निश्चित उपयोग होईल. आम्ही आखून दिलेल्या चौकटीत कामकाज करा, अशी अपेक्षा गडाख यांनी व्यक्त केली.

..

प्रसाद तनपुरे यांचीही घेतली भेट

जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके व संचालक प्रशांत गायकवाड यांनी राहुरी येथे माजी खासदार डॉ. प्रसाद तनपुरे यांची भेट घेतली. तनपुरे व शेळके यांच्यात बँकेच्या कारभारात चर्चा झाली.

...

सूचना फोटो: ०८ शेळके नावाने आहे.

Web Title: Manage the bank strictly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.