शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
2
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
3
'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू
5
“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार
6
Indigo Flight: ऐकावं ते नवल! विमानातही ट्रेनसारखा किस्सा; कन्फर्म सीटवर बसवला 'स्टँडबाय' प्रवासी, प्रकरण काय?
7
अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत
8
राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी
9
Buddha Purnima 2024: भगवान बुद्धांची प्रिय तिथी अर्थात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायला हवी ते जाणून घ्या!
10
मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम
11
उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु
12
Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट
13
त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?
14
नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
15
ऑनलाइन क्रशला भेटायला २४०० किमी दूर पोहचली युवती; त्यानंतर जे घडलं तिने डोक्याला हात लावला
16
पीपीएफ आणि दर महिन्याची ५ तारीख, अचूक टायमिंग लक्षात ठेवा; 1 कोटीचा फंड जमा करू शकाल
17
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
18
विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात; अल्ट्राटेकमध्ये तेजी, एसबीआय घसरला
20
काँग्रेस अन् भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली; बसप अध्यक्षा मायावती यांचा आरोप

‘लोकमत’ने केला ‘माईक’च्या टीमचा गौरव; उलगडला ‘पुरुषोत्तम’चा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 2:45 PM

विविध खेड्यांमधून नगरमध्ये शिक्षणासाठी दाखल झालेल्या तरुणांनी एकत्र येत माईक एकांकिका बसवली अन् पुण्यातील प्रतिष्ठेची पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धा गाजविली.

अहमदनगर : विविध खेड्यांमधून नगरमध्ये शिक्षणासाठी दाखल झालेल्या तरुणांनी एकत्र येत माईक एकांकिका बसवली अन् पुण्यातील प्रतिष्ठेची पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धा गाजविली. या तरुणांनी तब्बल ३५ वर्षानंतर पुरुषोत्तम करंडकावर नगरचे नाव कोरले़ अशा या माईक एकांकिकेच्या टीमचा ‘लोकमत’ने बुधवारी गौरव केला.‘लोकमत’चे सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे, आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, वरीष्ठ उपसंपादक सुरेश वाडेकर, सुदाम देशमुख यांच्या हस्ते ‘माईक’च्या टीमचा सत्कार करण्यात आला. यावेळी लेखक संदीप दंडवते, दिग्दर्शक कृष्णा वाळके, भैया ही भुमिका साकारणारा विराज अवचिते, साळवे भुमिका साकारणारा संकेत जगदाळे, सलीम साकारणारा ऋषभ कोंडावार, नेता व मॅनेजरची भूमिका करणारा अमित रेखी, निखिल शिंगे (डेव्हीड), आकाश मुसळे (मुश्ताक), शुभम पोपळे (हरिभाऊ), अभिषेक रकटे (पिंट्या) यांच्यासह अमोल साळवे, श्रेयस बल्लाळ, प्रिया तेलतुंबडे, संदीप कदम, शुभम घोडके, रेणुका ठोकळे आदी उपस्थित होते.माईक एकांकिकेच्या लिखाणापासून पुरुषोत्तम करंडक पटकावण्यापर्यंतचा प्रवास या टीमने ‘लोकमत’समोर उलगडला. वाघोलीजवळ वाहतूक कोडींत अडकलेल्या संदीप दंडवते यांनी मंडप उभारणीचे काम पाहिले अन् तेथेच ‘माईक’चा जन्म झाला़ त्यानंतर एकांकिका लिखाण, पात्र निवड अन् ‘माईक’चे प्रयोग असा सर्व प्रवास लेखक संदीप दंडवते यांनी उलगडून दाखविला़ तर ज्या न्यू आर्टस् कॉलेजकडून ही एकांकिका सादर झाली ते कॉलेजच पुरुषोत्तम स्पर्धेसाठी पात्र नसल्याचे समजणे आणि तेथून पुढे प्रवेश मिळविण्यापासून करावी लागलेली कसरत ते अजिंक्यपदाचा बहुमान असा प्रवास दिग्दर्शक कृष्णा वाळके यांने ‘लोकमत’समोर मांडला़