शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पत्रकार मारहाण प्रकरण : राहुरीतील हल्लेखोरांवर मोक्कानुसार कारवाई करा : अहमदनगर प्रेस क्लबची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 1:43 PM

लोकमतचे राहुरी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांच्यावर संघटीत गुन्हेगारी चालविणा-यांनी केलेला हल्ला हा भ्याड असून या सर्व आरोपींवर मोक्कानुसार कारवाई करण्याची मागणी अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली

अहमदनगर : लोकमतचे राहुरी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांच्यावर संघटीत गुन्हेगारी चालविणा-यांनी केलेला हल्ला हा भ्याड असून या सर्व आरोपींवर मोक्कानुसार कारवाई करण्याची मागणी अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. येवले यांच्यावर हल्ला करणा-या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासित करतानाच जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी उपअधीक्षक दर्जाच्या अधिका-याची समिती गठीत केली जाईल आणि त्यावर तातडीने निर्णय घेतले जातील, असेही पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी स्पष्ट केले.

( व्हिडिओ पाहण्यासाठी येथे भेट  https://www.facebook.com/LokmatNagar/videos/310628436519775/)राहुरीचे पत्रकार भाऊसाहेब येवले यांच्यावर राहुरीमध्ये झालेल्या प्राणघातक हल्याचा निषेध आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने आज जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधिक्षक ईशू सिंधू यांची भेट घेण्यात आली. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष व नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के, लोकमत आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश, सकाळचे निवासी संपादक अ‍ॅड. बाळ ज. बोठे, महाराष्ट्र टाइम्सचे ब्युरो चिफ विजयसिंह होलम, समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी, लोकसत्ताचे मोहनीराज लहाडे, पुढारीचे ब्युरो चिफ कैलास ढोले, नगर टाइम्सचे संपादक संदीप रोडे, नगर स्वतंत्रचे संपादक सुभाष चिंधे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातपुते, सचिव मुरलीधर कराळे, सुधीर मेहता, गणेश शेंडगे, मिलिंद देखणे, विक्रम बनकर, साहेबराव कोकणे, बाबा ढाकणे, सुर्यकांत नेटके, संजयकुमार पाठक, मयुर नवगिरे, राजू खरपुडे, सतिष रासकर, अनिल चौधरी, शिरीष शेलार, दत्तात्रय उनवणे, संदीप गाडे, सागर आनंदकर, अभिजित निकम, बबलू शेख, सिध्दार्थ दिक्षित, शरद कासार, शब्बीर सय्यद, सुशील थोरात, मुकुंद भट, राजेंद्र येंडे, निखील चौकर, रियाज शेख, दत्ता इंगळे, संदीप कुलकर्णी, सुर्यकांत वरकड, प्रदीप पेंढारे, प्रतिक शिंदे, समीर दाणी, कुणाल जायकर, विजय मते, रियाज पठाण, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अरुण वाघमोडे, अण्णा नवथर, सुदाम देशमुख, गोरख देवकर, शरद मेहेकरे उपस्थित होते.

( व्हिडिओ पाहण्यासाठी येथे भेट  https://www.facebook.com/LokmatNagar/videos/310628436519775/)प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी प्रास्ताविक करताना नगरच्या पत्रकारीतेची गौरवशाली परंपरा विषद केली. राहुरीतील पत्रकार धक्कादायक असून तेथे गुंडमवाल्यांचे राज्य असल्याकडे लक्ष वेधले. राहुरीतील या सर्व आरोपींवर मोक्कानुसार कारवाई करा अशी मागणीही यावेळी शिर्के यांनी केली. लोकमतचे सुधीर लंके यांनी घडलेला घटनाक्रम सांगितला आणि गेल्या काही वर्षात पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांचा पुढे काय तपास झाला हे समजत नसल्याने याबाबत आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी केली. बाळ ज. बोठे पाटील यांनी पत्रकारांवर होणारे असे भ्याड हल्ले निषेधार्ह असल्याचे स्पष्ट केले. महेंद्र कुलकर्णी यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सुधीर मेहता यांनीही भूमिका मांडली.( व्हिडिओ पाहण्यासाठी येथे भेट  https://www.facebook.com/LokmatNagar/videos/310628436519775/)हल्लेखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करताना अधिस्वीकृतीधारक पत्रकार जामिनदार घ्या - शिवाजी शिर्केपत्रकारांवरील वाढते हल्ले हे चिंताजनक असल्याचे पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या निदर्शनास आणून देतानाच पोलिस प्रशासनाकडून आता पत्रकारांच्या अपेक्षा वाढल्या असल्याकडे प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी लक्ष वेधले. राहुरीतील घटनेत पत्रकारावर हल्ला करणा-या आरोपींना मोक्का लावण्याची मागणी करतानाच या आरोपींची पोलिस कोठडी संपल्यानंतर जामिनावर सोडण्याआधी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करताना न्यायालयीन अधिकार प्राप्त असणा-या गुन्हे शाखेच्या निरीक्षकांनी या सर्व आरोपींना कलम ११० नुसार अधिस्वीकृतीधारक पत्रकार देण्याची अट टाकावी अशी मागणी अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी केली. प्रत्येक आरोपीसाठी नगर जिल्ह्यातील दैनिकाचा स्वतंत्र अधिस्वीकृतीधारक पत्रकार जामिनासाठी या आरोपींनी दिला तरच त्यांचा जामिन करावा अशी मागणीही श्री. शिर्के यांनी केली. पत्रकारावर हल्ला केला तर त्याची किंमत किती मोजावी लागते हे दाखवून देण्याची आता वेळ आली असून राहुरीतील या हल्लेखोरांना कोणत्याही पत्रकाराने जामिन होऊ नये अथवा त्यांची हमी घेऊ नये असे आवाहन अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी यावेळी केले.

( व्हिडिओ पाहण्यासाठी येथे भेट  https://www.facebook.com/LokmatNagar/videos/310628436519775/)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस