ज्ञानाबरोबरच कौशल्य निर्मिती करणे महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:20 AM2021-04-09T04:20:43+5:302021-04-09T04:20:43+5:30

कृषी विस्तार व संज्ञापन विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय सॉफ्ट स्किल व ...

It is important to build skills along with knowledge | ज्ञानाबरोबरच कौशल्य निर्मिती करणे महत्त्वाचे

ज्ञानाबरोबरच कौशल्य निर्मिती करणे महत्त्वाचे

Next

कृषी विस्तार व संज्ञापन विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय सॉफ्ट स्किल व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन डॉ. फरांदे बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुभाषचंद्र शिंदे, मिलिंद अहिरे, कृषी विस्तार व संज्ञापन विभागाचे प्राध्यापक गोरक्ष ससाणे, मनोहर धादवड, पुणे कृषी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक थॉमस, नाशिकचे सीईओ, लाईफ ॲण्ड बिझनेस कोच विक्रम काजळे, ठाणेचे लाईफ कोच ॲण्ड हिप्नॉटिस्ट सुशील धनवडे आणि पुणेचे फ्लायऐजिस्ट एअर फोर्स स्कूलचे सुमिता चावरे उपस्थित होते.

सुभाषचंद्र शिंदे म्हणाले, कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण ही एक महत्त्वाची विस्तार पध्दती असून, कृषी तंत्रज्ञानाच्या प्रचार व प्रसारासाठी विस्तार कार्यकर्त्यांकडे सॉफ्ट स्किल असणे हे महत्त्वाचे आहे. कोरोना काळात या प्रशिक्षणातून मिळवलेले ज्ञान व कौशल्य सहभागी प्रशिक्षणार्थींना कृषी विस्तार कार्यात व वैयक्तिक आयुष्यात खूप उपयोगी पडेल. मिलिंद अहिरे म्हणाले, कोरोनामुळे सद्यपरिस्थितीत अनेकांना वैयक्तिक, पारिवारिक, कार्यालयीन पातळीवर ताण-तणावांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण सहभागी प्रशिक्षणार्थींना मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी व सामाजिक संबंध सदृढ ठेवण्यासाठी उपयोगी ठरेल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मनोहर धादवड यांनी दोन दिवसीय प्रशिक्षणाचे पुनर्विलोकन केले. विक्रम काजळे, सुशील धनवडे आणि सुमिता चावरे या तज्ज्ञांकडून सहभागी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: It is important to build skills along with knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.