शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

्कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील ५६ जणांची तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 5:17 PM

अहमदनगर : नगर शहरात एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून, या महिलेच्या संपकार्तील ५६ जणांची तपासणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात येणार आहे,अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.

अहमदनगर : नगर शहरात एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून, या महिलेच्या संपकार्तील ५६ जणांची तपासणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात येणार आहे,अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.नगर शहरातील झेंडीगेट परिसरातील सुभेदारी गल्ली येथील  महिलेला सर्दी,खोकला, ताप आदी त्रास झाला होता. म्हणून ही महिला स्वत:हून येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. ‘सारी’ या आजाराची लक्षणे आढळून आल्याने या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. महिलेचा अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने महापालिकेने या महिलेला ताब्यात घेऊन सुरुवातीला बूथ हॉस्पिटलमध्ये नेले होते. परंतु या महिलेला जास्त त्रास होत असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या महिलेची विचारपूस केली असता ही महिला एका डॉक्टरकडे उपचार घेत होती. या डॉक्टरसह या भागातील भागातील ५६ जण महिलेच्या संपर्कात आले आहेत, असे आढळून आले. त्यांना एका बसमधून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे या रुग्णांची तपासणी सुरू आहे. तपासणीचे अहवाल आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करायचे की घरी सोडायचे, याचा निर्णय होणार आहे.