शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

वाळू तस्करीविरोधात ग्रामसभाच करू शकतात उठाव : ग्रामसभांना ‘लोकमत’चे व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:08 PM

दुष्काळी परिस्थितीमुळे मुळा, भीमा, प्रवरा, गोदावरी या प्रमुख नद्यांच्या पात्रात सध्या पाणी नाही. ही संधी साधून अनेक गावांमधून बेकायदा वाळू उपसा सुरु आहे.

अहमदनगर : दुष्काळी परिस्थितीमुळे मुळा, भीमा, प्रवरा, गोदावरी या प्रमुख नद्यांच्या पात्रात सध्या पाणी नाही. ही संधी साधून अनेक गावांमधून बेकायदा वाळू उपसा सुरु आहे. सर्वच तालुक्यांत हे चित्र असून प्रशासन कुचकामी ठरत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनीग्रामसभा घेऊन वाळू तस्करीचा एकजुटीने मुकाबला करण्याची आवश्यकता आहे. गावे पेटून उठल्यास वाळू तस्करी थांबविणे शक्य आहे.सध्या अकोले, संगमनेर, पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड या तालुक्यांत मोठी वाळू तस्करी सुरु आहे. गतवर्षी पाऊस कमी झाला. त्यामुळे नद्या आटून गेल्या आहेत. नदीकाठच्या गावांनासुद्धा पिण्यासाठी पाणी नाही. शेतीचीही बिकट अवस्था आहे. नदीकाठच्या विहिरीही आटल्या आहेत. शेतकरी अडचणीत असताना वाळू तस्कर मात्र खुशीत आहेत. शासनाच्या महसुलाचे व जनतेचे नुकसान करत ते लाखो रुपयांची कमाई करत आहेत. पाऊस पडेपर्यंत उपसा सुरुच राहिल्यास जिल्ह्याचे वाळवंट होण्याचा धोका आहे. त्यामुळे नद्यांचा समतोल बिघडून पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. आम्ही नदीपात्राकडे निघालो की वाळू तस्करांचे खबरे नदीपात्रात खबर पोहोचवितात. त्यामुळे पथक पोहोचण्याच्या आतच तस्कर गायब होतात, अशी कारणे प्रशासन देत आहे. मात्र, प्रशासन तस्करांबाबत सामूहिकपणे नदीपात्रात उतरताना दिसत नाही. पोलीस, महसूल व आरटीओ प्रशासनात सुसंवाद दिसत नाही. प्रशासनाने एकदिलाने वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्यास ते पुन्हा नदिपात्रात येणार नाहीत. पण, तसे घडत नाही.गावाने करावा वाळू तस्करांचा मुकाबलाशासकीय परिपत्रकाप्रमाणे गावांकडेही वाळूचे संरक्षण सोपविण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामसभा घेऊन गावात वाळू उपसा करु द्यायचा नाही, असा ठराव करु शकते. सर्व गाव सामूहिकपणे नदीपात्रात उतरले व त्यांनी वाळू तस्करांना जाब विचारला तर वाळू तस्कर पळ काढतील. मात्र, गावांची एकजूट होत नाही याचा फायदा वाळू तस्कर घेत आहे. वाळू तस्कर गावात आल्यानंतर गावकरी एकजुटीने रस्ता अडवून पोलीस व महसूल प्रशासनाला बोलवू शकतात. तलाठी, सर्कल, ग्रामसेवक या स्थानिक कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गावकरी वाळूू तस्करी थांबवू शकतात.मात्र, यासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावाने एकमुखी पुढाकार घेणे आवश्यक आहे.नदीचे चित्रीकरण आवश्यकवाळू उपसा होणारी जी संशयित ठिकाणे आहेत तेथे तहसिलदरांनी व ग्रामपंचायतने चित्रीकरण व छायाचित्रीकरण करुन ठेवणे आवश्यक आहे. या चित्रीकरणात नदिपात्रातील उपलब्ध वाळू दिसेल. पुढे तेथील वाळूसाठा कमी झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित तलाठी, सर्कल, ग्रामसेवक , ग्रामपंचायत यांना जाब विचारला जाणे आवश्यक आहे. मुख्य चौकात सीसीटीव्हीही लावता येतील.‘लोकमत’ घेणार वाळू तस्करीच्या प्रतिबंधासाठी पुढाकारअवैध वाळू उपसा कसा रोखता येईल? याबाबतचा आराखडा ठरविण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार ‘लोकमत’ लवकरच यासंदर्भात अधिकारी, पर्यावरण तज्ज्ञ व जागरुक नागरिक यांची एकत्रित बैठक घेणार आहे. या बैठकीत प्रशासन व जनता यांच्यात संवाद घडवून आराखडा ठरविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.ग्रामसभांना ‘लोकमत’चे व्यासपीठवाळू तस्करीला पायबंद घालण्यासाठी नदीकाठच्या गावांनी ग्रामसभा आयोजित केल्यास अशा ग्रामसभांना ‘लोकमत’ व्यापक प्रसिद्धी देऊन या गावांच्या पाठिशी उभा राहणार आहे. वाळूू तस्करी रोखलेल्या काही गावांना ‘लोकमत’ने यापूर्वीच पर्यावरण संवर्धनासाठीचा पुरस्कार देऊन गौरविले आहे. पर्यावरण संवर्धन करणाऱ्या गावांची गरज आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर