Fake currency in Maharashtra bank | महाराष्ट्र बँकेत नकली नोटा
महाराष्ट्र बँकेत नकली नोटा

अहमदनगर : शहरातील चितळे रोडवरील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेत सहा नकली नोटा आढळून आल्या आहेत़ यामध्ये ५०० रुपयांची एक व १०० रुपयांच्या पाच नोटा आहेत़ विशेष म्हणजे पाच महिन्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे़
याप्रकरणी बँकेच्या चितळे रोड शाखेतील अधिकारी प्रियंका मदमोहन दुआ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि़१८) फिर्याद दाखल केली आहे़ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ महाराष्ट्र बँकेच्या कोणत्यातरी शाखेत एका खातेदाराने २२ नोव्हेंबर २०१८ रोजी पैसे भरताना त्यात सहा बनावट नोटा भरल्या होत्या़ मध्यंतरीच्या पाच महिने बनावट नोटा असल्याचे कुणाच्या निदर्शनास आले नाही़ मात्र चितळेरोड शाखेतून मंचर येथील शाखेत रोकड पाठविली तेव्हा या सहा नोटा बनावट असल्याचे समोर आले़ या प्रकरणातून बाजारपेठेत नकली नोटा चलनात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे़ याप्रकरणी पुढील तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक एस़एम़सोनवणे हे करत आहेत़


Web Title:  Fake currency in Maharashtra bank
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.