शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अकरावी प्रवेश : १३ जुलैपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:07 PM

दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे़ अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाकडून उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे़

अहमदनगर : दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे़ अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाकडून उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे़ १३ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणार असून, १३ जुलै अखेर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे़बुधवारी (दि़१२) नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजमधील राजर्षी शाहू महाराज सभागृहात सकाळी ११ वाजता अकरावी प्रवेशाबाबत नियोजन बैठक घेण्यात आली़ प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्याकडे माध्यमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे त्यांनी प्राचार्य, मुख्याध्यापकांची बैठक घेतली़ बैठकीत प्रत्येक उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमधील जागांचा आढावा घेऊन प्रवेशाबाबत चर्चा करण्यात आली़ अकरावी प्रवेशासाठी १३ ते २४ जून या काळात कॉलेज स्तरावर प्रवेश अर्जाचें वाटप करणे, २५ ते २८ जून दरम्यान भरलेले फॉर्म सादर करणे, २९ व ३० जून रोजी कॉलेज स्तरावर प्रवेश अर्जांची छाननी करणे, १ जुलै रोजी चेक लिस्ट प्रसिद्ध करुन आक्षेप दुरुस्ती करणे, २ जुलै रोजी प्रथम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे तसेच २ ते ६ जुलैपर्यंत प्रथम गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देणे, ८ जुलै रोजी दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करुन १० जुलैपर्यंत दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देणे, ११ जून रोजी जागा रिक्त असल्यास तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करुन १३ जुलैपर्यंत प्रवेश देण्याचे नियोजन उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे़ १३ जुलै रोजी प्रवेश प्रक्रिया बंद करुन १५ जुलैपासून कॉलेज नियमित सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही जागा रिक्त असल्यास प्राचार्यांच्या अधिकारात २५ जुलैपर्यंत प्रवेश देण्याची मुभा देण्यात आली आहे़ मात्र, त्यानंतर प्रवेश झाल्यास संबंधित कॉलेजवर कारवाई होऊ शकते, असेही सांगण्यात आले़ गुणवत्तेनुसार प्रवेश देताना राखीव जागांचे प्रमाण काटेकोरपणे पाळावे, असेही आदेशात म्हटले आहे़ मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ५२ टक्के जागा व विशेष आरक्षणाच्या १३ टक्के जागा अशा एकूण ६५ टक्के जागा आरक्षणातून भरण्यात येणार आहेत़अशी आहे आरक्षणाची टक्केवारीएससी १३ टक्के, एसटी ७ टक्के, ओबीसी १९ टक्के, एसबीसी २ टक्के, एनटी (अ) ३ टक्के, एनटी (ब) २़५ टक्के, एनटी (क) ३़५ टक्के, एनटी (ड) २ टक्के अशा ५२ टक्के जागा जातीनिहाय आरक्षणातून भरल्या जाणार आहेत़ तर विशेष आरक्षणातून आजी-माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक व नोकरीत बदल झालेल्या शासकीय नोकरदारांच्या पाल्यांसाठी ५ टक्के जागा राखीव असतील़ क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के व ४० टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के जागा राखीव राहतील, असे शिक्षणाधिकारी काठमोरे यांनी सांगितले़प्रवेश अर्ज विनामूल्यअनुदानित प्रवेश पूर्ण झाल्यानंतरच विनाअनुदानित जागांवरील प्रवेश सुरु करावेत़ विनाअनुदानित प्रवेश देताना जास्तीचे शुल्क आकारल्यास तसेच प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका देताना विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्यास संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय