शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

डंपरच्या धडकेने वीज वाहक तारा तुटल्या; कोपरगाव तालुक्यातील निम्मे गावे १६ तासांपासून अंधारात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 5:36 PM

कोपरगाव शहरातून तालुक्यातील वारी येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात येणा-या बिरोबा चौकात एका वीज वाहक तारांच्या खांबाला एका डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात चालक, क्लिनर बचावले. मात्र वीज खंडित झाल्याने निम्मा कोपरगाव तालुका अंधारात आहे.

कोपरगाव : शहरातून तालुक्यातील वारी येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात येणा-या बिरोबा चौकात एका वीज वाहक तारांच्या खांबाला एका डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात चालक, क्लिनर बचावले. मात्र वीज खंडित झाल्याने निम्मा कोपरगाव तालुका अंधारात आहे. शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. डंपरने वीज खांबाला धडक देताच विजेचे मोठे लोळ जमिनीवर पडले. सुदैवाने डंपर चालक व मदतनीस यांनी उडी मारल्याने जीवितहानी झाली नाही. दरम्यान शुक्रवारी रात्रीपासून पूर्व भागातील सर्वच गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. सध्या महावितरणच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्ती सुरू आहे. परंतु आजवर तीन वेळा अशाच प्रकारे समृद्धी महामार्गात डंपरने महावितरणच्या पोलला धडक दिली आहे. त्यात महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु महावितरण प्रशासनाकडून एकदाही समृद्धी महामार्गाच्या ठेकेदार अथवा वाहनचालकांवर किंवा वाहनावर कारवाई केली गेली नाही. शनिवारी सोळा तासापासून सर्वत्र वीज पुरवठा खंडित आहे. यामुळे बँका, सेतू कार्यालय, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा , पतसंस्था, आरोग्य केंद्र यांचे कामकाज ठप्प झाले. एकंदरीत वीज पुरवठा खंडित झाला आहे. तरी सदर ठेकेदार तसेच डंपर चालक-मालक यांच्यावर कारवाई करावी, अशी  मागणी होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगर