कुऱ्हाड बंदीमुळेच हिवरे बाजारमध्ये वनराई फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:14 AM2021-07-24T04:14:52+5:302021-07-24T04:14:52+5:30

निंबळक : शुद्ध हवा व नैसर्गिक ऑक्सिजन पाहिजे असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही. जागतिक कोरोना महामारीत अनेक अडचणींना सामोरे ...

Due to the ban on axes, forests flourished in Hiware Bazaar | कुऱ्हाड बंदीमुळेच हिवरे बाजारमध्ये वनराई फुलली

कुऱ्हाड बंदीमुळेच हिवरे बाजारमध्ये वनराई फुलली

Next

निंबळक : शुद्ध हवा व नैसर्गिक ऑक्सिजन पाहिजे असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही. जागतिक कोरोना महामारीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे अनेकांना झाडांचे महत्त्व उमगले. हिवरे बाजार येथे नवनवीन उपक्रम या ठिकाणी पाहावयास मिळाले. शासनाच्या योजनांचा लाभ गावाने घेतला आहे. कुऱ्हाडबंदी कायद्याची सक्षमपणे अंमलबजावणी केल्यामुळे गावात वनराई फुललेली आहे, असे प्रतिपादन कॅप्टन अशोककुमार खरात यांनी केले.

हिवरे बाजार येथे कॅप्टन खरात यांच्या हस्ते गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्य आदर्श गाव समिती कार्याध्यक्ष पोपटराव पवार, तहसीलदार उमेश पाटील, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, वन अधिकारी सुनील थिटे, मंडळ कृषी अधिकारी जगदीश तुंभारे, शंकर खाडे, जालिंदर गांगर्डे आदी उपस्थित होते.

पोपट पवार म्हणाले, हिवरे बाजारचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गावकऱ्यांची सांघिक भावना महत्त्वाची ठरली आहे. सर्वांच्या मदतीने व सहकार्याने गावाचा कायापालट झालेला आहे. वृक्षसंवर्धनामुळे पावसाचे प्रमाण इतर गावांच्या तुलनेत खूप जास्त आहे. बागायती क्षेत्र काळानुरूप वाढते आहे. उन्हाळ्यातही कधीच पाण्याची टंचाई भासत नाही. वृक्ष लावून आम्ही थांबत नाही, तर ते जगविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो.

----

२३ हिवरे बाजार

हिवरे बाजार येथे कॅप्टन अशोककुमार खरात यांच्या हस्ते गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राज्य आदर्शगाव समिती कार्याध्यक्ष पोपटराव पवार, तहसीलदार उमेश पाटील, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, वन अधिकारी सुनील थिटे व इतर.

230721\img-20210723-wa0404.jpg

हिवरे बाजार येथे वृक्षारोपन

Web Title: Due to the ban on axes, forests flourished in Hiware Bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.