ऑक्सिजन संपल्याने डॉक्टर हतबल, रुग्णांना घेऊन जाण्याचे  नातेवाईकांना साकडे, रुग्णांचे जीव धोक्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 01:53 PM2021-04-20T13:53:34+5:302021-04-20T14:01:25+5:30

अहमदनगर: शहरातील खासगी रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील डाक्टर हतबल झाले आहेत. ऑक्सिजन नसल्याने उपचार करणा-या रुग्णांना कुठेही घेऊन जा अशा विनवण्या खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी नातेवाईकांना केल्या आहेत.

Doctors are helpless due to lack of oxygen, relatives are being rushed to take the patients, the lives of the patients are in danger | ऑक्सिजन संपल्याने डॉक्टर हतबल, रुग्णांना घेऊन जाण्याचे  नातेवाईकांना साकडे, रुग्णांचे जीव धोक्यात 

ऑक्सिजन संपल्याने डॉक्टर हतबल, रुग्णांना घेऊन जाण्याचे  नातेवाईकांना साकडे, रुग्णांचे जीव धोक्यात 

Next

अहमदनगर: शहरातील खासगी रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील डाक्टर हतबल झाले आहेत. ऑक्सिजन नसल्याने उपचार करणा-या रुग्णांना कुठेही घेऊन जा अशा विनवण्या खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी नातेवाईकांना केल्या आहेत.

नगर शहरातील ऑक्सिजनचा पुरवठा  बंद झाल्याने शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती भयानक झाली आहे. शहरात ऑक्सिजनची 50 टनाची गरज असताना फक्त 22 टनच ऑक्सिजन मिळत आहे. जो काल परवा मिळत होता तोही ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागल्याने डॉक्टर चिंतेत आहेत.

दुसरीकडे ऑक्सिजन पुरवठयाबाबत प्रशासनाने समन्यायी वाटपासाठी समिती नियुक्त केली आहे. पण ऑक्सिजनचा पुरवठाच नाही तर वाटप कशाचे करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Doctors are helpless due to lack of oxygen, relatives are being rushed to take the patients, the lives of the patients are in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.