शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
‘मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलंय, भाजपानं त्यांच्यावर…’, संजय राऊतांची बोचरी टीका 
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
5
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
6
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
7
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
9
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
10
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
11
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
12
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
13
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
14
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
15
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
16
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
17
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
18
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
19
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
20
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...

दिव्या कारखिले मृत्यू प्रकरण : पोलीस तपास अडकला प्रयोगशाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 11:15 AM

पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील सहावीतील बारा वर्षीय विद्यार्थिनी दिव्या हनुमंत कारखिले हिच्या शवविच्छेदनानंतरचे अहवाल प्रयोगाशाळांकडून पोलिसांना प्राप्त झालेले नाहीत.

शिरीष शेलार जवळे : पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील सहावीतील बारा वर्षीय विद्यार्थिनी दिव्या हनुमंत कारखिले हिच्या शवविच्छेदनानंतरचे अहवाल प्रयोगाशाळांकडून पोलिसांना प्राप्त झालेले नाहीत. अहवालाअभावी पोलीस तपास ठप्प झाला आहे. त्यामुळे तिच्या मृत्यूचा तपास प्रयोगशाळेत अडकून पडला आहे.२३ नोव्हेंबरला दिव्या घरातून बेपता झाली होती. त्यानंतर २६ नोव्हेंबरला घरापासून जवळच असणाऱ्या विहिरीतील पाण्यावर तिचा मृतदेह तरंगताना आढळला. बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसानंतरही तपास न लागल्याने ग्रामस्थांनी आक्रमक होऊन शिरूर-राळेगण थेरपाळ मुख्य रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयंत मिना यांनी ग्रामस्थांना शांत करण्यासाठी दिव्याचा मृतदेह ससून रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. पण मृतदेह कुजलेला असल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. त्यामुळे तिच्या शरीरातील काही भाग नाशिक व मुंबई येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पंधरा दिवसांत प्रयोगशाळांचे अहवाल येतील. त्यानंतर मृत्यूचे कारण व आरोपी निश्चित करणे शक्य होईल, असे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले होते.दिव्या कारखिले हिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास लागून आरोपीचा लवकरात लवकर शोध न लागल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.२५ दिवसानंतरही या घटनेच्या पोलीस तपासात प्रगती झालेली नाही. त्यामुळे नगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्याशी संपर्क साधला असता, नाशिक व मुंबई येथील प्रयोगशाळांमधून दिव्याच्या मृत्यूबाबत लेखी अहवाल आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.नाशिक येथील न्याय सहायक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल तयार झालेला आहे. परंतु मुंबई येथील न्याय सहायक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. नाशिक, मुंबई व पुणे येथील संबंधित डॉक्टर जो अहवाल देतील, तो मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करणे शक्य होईल. - बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक, पारनेर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर