शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

दिलीप गांधी खासदार नव्हे ‘खावदार’ : अनिल राठोड यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:10 AM

उंदीर असलेल्यांनी वाघावर बोलू नये. तेवढी त्यांची बोलण्याची उंची नाही. विविध माध्यमांतून केवळ खाऊगिरी करणारे दिलीप गांधी हे खासदार नव्हे, तर खावदार आहेत. केडगाव हत्याकांडानंतर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शिवसैनिकांच्या कुटुंबीयांचे साधे सांत्वनही केले नाही, की हत्याकांडाच्या घटनेचा निषेधही केला नाही. यासाठी त्यांना नेमकी कोणाची भीती आहे? असा सवाल शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला.

अहमदनगर : उंदीर असलेल्यांनी वाघावर बोलू नये. तेवढी त्यांची बोलण्याची उंची नाही. विविध माध्यमांतून केवळ खाऊगिरी करणारे दिलीप गांधी हे खासदार नव्हे, तर खावदार आहेत. केडगाव हत्याकांडानंतर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शिवसैनिकांच्या कुटुंबीयांचे साधे सांत्वनही केले नाही, की हत्याकांडाच्या घटनेचा निषेधही केला नाही. यासाठी त्यांना नेमकी कोणाची भीती आहे? असा सवाल शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगर येथील पत्रकार परिषदेत भाजप सरकार निकम्मे असून हत्याकांडांच्या घटनेमुळे नगरचा बिहार झाल्याची टीका केली होती. त्यावर खासदार गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे हे नगरची बदनामी करीत असून, शिवसेनेकडे विकासाचा अजेंडा नसल्याने शिवसेनाच निकम्मी असल्याचा टोला लगावला होता. त्याचा राठोड यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. राठोड म्हणाले, गांधी यांच्यावरही खंडणी, अपहरणाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांनाही लवकरच पिंजºयात जावे लागेल.केडगाव हत्याकांडाबाबत बोलायला त्यांना २० दिवसांनंतर जाग कशी आली? खासदारांच्या पुत्राची एलईडीची कंपनी आहे. हेच बोगस दिवे शहरात बसविले जात आहेत. एका दिवसात ते बंद पडत असून, केवळ त्यांची खाऊगिरी सुरू आहे. त्यांना शिवसेनेसोबत युती नको आहे, मात्र आम्हालाच गांधी यांच्यासोबत युती नको आहे. खºया भाजपसोबत आम्ही आहोत. युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होतो. गांधी हे भाजपचे नव्हे, तर केवळ छिंदम गटाचे आहेत. काँग्रेसचा उमेदवार विशाल कोतकर निवडून यावा, यासाठीच त्यांनी निवडणुकीतून पळ काढला. कोतकर हेकदाचित गांधी यांचे सावत्र सोयरे असावेत. भैरवनाथ पतसंस्थेचे त्यांनी कर्ज घेतले, यावरून ते सिद्ध होते. खासदारांनी गांधी या आडनावालाच कलंक लावला. महापालिकेच्या फेज टू बाबत त्यांनी टीका केली. मात्र यापूर्वीच्या सत्ताधा-यांनी या योजनेत घोटाळे केले, त्यावेळी त्यांची बोलायची हिंमत का झाली नाही? असा सवालही राठोड यांनी केला.

दिलीप गांधी यांचे डिपॉझिट जप्त होईलकेडगावच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले. आता लोकसभा निवडणुकीला उभे राहिले तर दिलीप गांधी यांचे डिपॉझिट जप्त होईल. आतापर्यंत शिवसेना सोबत होती म्हणूनच ते तीनवेळा खासदार झाले. शिवाजी कर्डिले विरुद्ध दिलीप गांधी अशी निवडणूक झाली, त्यावेळी आपले नाते भगव्याशी असल्याचे सांगत गांधी यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे माझे सोयरे कोण आहेत, हे गांधी यांनी सांगू नये, अशा शब्दांत शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी गांधी यांचा समाचार घेतला. त्यामुळे लोकसभेचे तिकीट मिळाले तर गांधी हे चौथ्या क्रमांकांवर राहतील. शीला शिंदे महापौर असताना महापालिकेच्या पाणीयोजनांसाठी शिर्डीचे तत्कालीन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पाठपुरावा केल्यामुळे महापालिकेला निधी मिळाला. त्यामुळे गांधी यांनी निधी आणल्याची टिमकी वाजवू नये, असे प्रा. गाडे म्हणाले.गांधींनी कर्ज थकवून ठेवीदारांची वाट लावलीभाई रायसोयी पतसंस्था, रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे कोट्यवधी रुपयांचे खासदार गांधी यांनी कर्ज घेतले. हे कर्ज त्यांनी परत केले नाही. त्यामुळे या पतसंस्थांची वाट लागली. याला खासदार गांधी हेच जबाबदार आहेत. याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. केडगावची भैरवनाथ पतसंस्था खासदारांना नेहमीच कर्ज देते. त्यामुळे त्यांचे कोतकरांशी लागेबांधे आहेत, हेच स्पष्ट होते, असा आरोप राठोड यांनी केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAnil Rathodअनिल राठोडDilip Gandhiखा. दिलीप गांधीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड