शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान अखेर जिंकला, पण संथ खेळीमुळे खड्ड्यात राहिला; १४ षटकांत जिंकायचं होतं, पण... 
2
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
3
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
4
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
5
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
6
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
7
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
8
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
9
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
10
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
11
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
12
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
13
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
14
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
15
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
16
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
17
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
18
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
19
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
20
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

शाळेतील खिचडीला मिळणार ठसकेबाज ‘फोडणी’; शाळांमध्ये आता पाककृती स्पर्धा, १ ते १५ सप्टेंबरदरम्यान आयोजन 

By चंद्रकांत शेळके | Published: August 31, 2023 7:37 PM

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

अहमदनगर : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिवाय देशात सप्टेंबर महिना पोषणमाह म्हणूनही साजरा होतो. याचनिमित्ताने शालेय पोषण आहाराची गोडी वाढावी म्हणून शाळा व तालुकास्तरावर पाककृती स्पर्धांचे आयोजन १ ते १५ सप्टेंबरदरम्यान केले जाणार आहे. त्यातील उत्कृष्ट पाककृतींना बक्षिसेही मिळणार आहेत.

जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना दुपारी दररोज पोषण आहार दिला जातो. जिल्ह्यात ४ हजार ५४८ शाळांतील ४ लाख ७२ हजार ८९४ विद्यार्थी रोज ही खिचडी खातात. परंतु अनेक ठिकाणी ही खिचडी बेचव असल्याच्या तक्रारी आहेत. त्यात पौष्टिक तृणधान्ये समाविष्ट करून खिचडी अधिक रूचकर व्हावी, या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. याशिवाय बहुतांश शाळांमधून मोठ्या प्रमाणात शाळा व्यवस्थापन समिती, पालक, विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहकार्याने परसबाग विकसित केलेल्या आहेत. या परसबागेतील उत्पादित भाजीपाल्याचा समावेश नियमितपणे आहारामध्ये देखील करण्यात येत आहे. केंद्र सरकारने देखील आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने तृणधान्य विषयक जनजागृती करण्याचे निर्देश दिलेले आहेत. बदलत्या जीवनशैलीत जंकफूड खाण्याच्या सवयीमुळे आहारातून पौष्टिक तृणधान्यांचा वापर कमी होत चालला आहे. मुलांचा आहार कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वांनी समृद्ध असणे आवश्यक आहे. ही गरज तृणधान्यामधून भागविणे शक्य आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच तृणधान्ययुक्त आहाराची सवय लावणे आवश्यक आहे. याकरिता तृणधान्यापासूननिर्मित विविध पाककृतींचा समावेश दैनंदिन आहारामध्ये केल्यास मुलांना वेगळेपणा मिळेल व हा आहार विद्यार्थी आवडीने खाऊ शकतील, याच हेतूने ही पाककृती स्पर्धा आयोजित केली आहे. अशी असेल स्पर्धासप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शाळा स्तरावरील स्पर्धा आयोजित केली जाईल. त्यात शालेय पोषण आहार शिजवणारे स्वयंपाकी, मदतनीस किंवा पालकही सहभागी होऊ शकतात. त्यातून उत्कृष्ट पाककृतींची निवड तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी होईल. तालुका स्तरावरील स्पर्धा दुसऱ्या आठवड्यामध्ये घेण्यात येईल.

तालुका स्तरीय पाककृतींना असे मिळेल बक्षीस

  1. प्रथम - ५ हजार
  2. द्वितीय - साडेतीन हजार
  3. तृतीय - अडीच हजार

 अनुदानाची मागणी कराविहीत कालावधीत स्पर्धांचे नियोजन करून जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी बक्षिसाच्या रकमेसाठी अनुदानाची मागणी शिक्षण संचालनालयाकडे करावी, अशा सूचना शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSchoolशाळा