वादग्रस्त तहसीलदार देवरे यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:26 AM2021-09-14T04:26:04+5:302021-09-14T04:26:04+5:30

देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ‘आपणाला दीपाली चव्हाण यांच्या मार्गाने जावे वाटत आहे’ असे सांगत त्यांनी या ...

Controversial Tehsildar Deore replaced | वादग्रस्त तहसीलदार देवरे यांची बदली

वादग्रस्त तहसीलदार देवरे यांची बदली

Next

देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ‘आपणाला दीपाली चव्हाण यांच्या मार्गाने जावे वाटत आहे’ असे सांगत त्यांनी या क्लिपमध्ये आत्महत्येचा विचार व्यक्त केला होता. आपणाला लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून त्रास होत असल्याचेही त्यांनी क्लिपमध्ये म्हटले होते. त्यांचा रोख हा आमदार निलेश लंके यांच्या दिशेने असल्याने लंके व देवरे असा संघर्षही पेटला होता. देवरे यांनी प्रांत, निवासी उपजिल्हाधिकारी यांचेबाबतही तक्रार केली होती.

देवरे यांनी महिला आयोग व विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या तक्रारींत काहीही तथ्य आढळले नाही. त्यांच्या कामकाजाबाबत अरुण आंधळे व निवृत्ती कासुरे यांनी महसूल मंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत मात्र तथ्य आढळले असून देवरे यांनी कामकाजात गंभीर स्वरुपाच्या अनियमितता केल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांनी शासनाला दिला आहे. देवरे यांनी कार्यक्षेत्राबाहेर जाऊन पदाचा दुरुपयोेग केला. तसेच समाजमाध्यमे, वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये भाष्य करून शासनाची प्रतिमा मलीन केली असा ठपका त्यांचेवर बदली आदेशात ठेवण्यात आला आहे. देवरे यांना मंगळवारी तातडीने एकतर्फी कार्यमुक्त करावे असे आदेशात म्हटले आहे.

ऑगस्ट २०१८ मध्ये देवरे या पारनेर येथे रुजू झाल्या होत्या. देवरेंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपचे देेवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांनी त्यांची पाठराखण करत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी केली होती. देवरे यांच्या बदलीनंतर वाघ यांनी शासनावर टीका केली असून शासन महिलांची गळचेपी करत आहे, असा आरोप केला आहे. दरम्यान, देवरेंविरोधात लोकायुक्तांकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. बदली आदेशाबाबत देवरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Controversial Tehsildar Deore replaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.