सरकारच्या विरोधात आता सर्वसामान्यांनी संघटित व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:17 AM2021-01-09T04:17:56+5:302021-01-09T04:17:56+5:30

जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने शुक्रवारी माळीवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शेतकरी कायद्याच्या विरोधासाठी ...

The common man should now unite against the government | सरकारच्या विरोधात आता सर्वसामान्यांनी संघटित व्हावे

सरकारच्या विरोधात आता सर्वसामान्यांनी संघटित व्हावे

Next

जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने शुक्रवारी माळीवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शेतकरी कायद्याच्या विरोधासाठी नगर ते नाशिक किसान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तांबे बोलत होते. यावेळी सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश झावरे, आ. लहू कानडे, शहर जिल्हाध्यक्ष मनोज लोंढे, बाबा खरात, पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, प्रदेश सदस्य शामराव वघसकर, नगर शहर जिल्हा अध्यक्ष किरण काळे, ज्ञानदेव वाफारे, शारदा वाघमारे, दिलीप बागल, रिजवान शेख, किरण आळकुठे, नीता बडे, मीना घाडगे, खलील सय्यद आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. तांबे म्हणाले गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीत सुरू आहे. भाजप सरकार मात्र त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार नाही. लोकांची दिशाभूल करणे आणि आंदोलन मोडून काढणे, असा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही त्यांचा प्रयत्न सफल होऊ देणार नाही. दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून ही रॅली पक्षाच्या वतीने काढण्यात आली आहे. यावेळी आ कानडे, खरात, पगडाल, जिल्हा अध्यक्ष झावरे, प्रदेशाध्यक्ष अवताडे यांची रॅलीच्या ठिकाणी भाषणे झाली व आ. तांबे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली.

फोटो ०८ शेतकरी आंदोलन

ओळी- जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आयोजित किसान रॅलीची सुरुवात आ. सुधीर तांबे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली.

Web Title: The common man should now unite against the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.