चिचोंडी पाटील येथे ‘जलयुक्त’च्या कामांची समितीकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:21 AM2021-03-05T04:21:56+5:302021-03-05T04:21:56+5:30

चिचोंडी पाटील : जिल्ह्यातील कृषी विभागाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या जलसंधारण कामांची खुली चौकशी करण्यासाठी व प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी ...

Committee inspects the works of 'Jalyukat' at Chichondi Patil | चिचोंडी पाटील येथे ‘जलयुक्त’च्या कामांची समितीकडून पाहणी

चिचोंडी पाटील येथे ‘जलयुक्त’च्या कामांची समितीकडून पाहणी

Next

चिचोंडी पाटील : जिल्ह्यातील कृषी विभागाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या जलसंधारण कामांची खुली चौकशी करण्यासाठी व प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गुरुवारी साडेचारच्या सुमारास चिचोंडी पाटील (ता. नगर) शिवारातील जलसंधारण कामांना प्रत्यक्ष भेट दिली.

चिचोंडी पाटील येथील दौलावडगाव रस्त्यालगत असलेल्या पठार शिवारात कामाची त्यांनी पाहणी केली. यावेळी मृदसंधारण संचालक शितोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, सरपंच मनोज कोकाटे, भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक कोकाटे आदी उपस्थित होते.

यावेळी समितीच्या अधिकाऱ्यांनी पठार शिवारात झालेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी येथील जलयुक्त शिवारच्या कामांची माहिती घेतली. अशोक कोकाटे यांनी ग्रामसभेत ठराव करून गावात मृद व जलसंधारण अंतर्गत झालेल्या कामांच्या यादीची मागणी केली होती. मात्र, लघु पाटबंधारे आणि कॄषी विभागाकडून माहिती मिळाली नसल्याची बाब समितीच्या निदर्शनाला आणून देण्यात आली. यावेळी समितीने संबंधित अधिकाऱ्यांना कामाची माहिती देण्याचे आदेश दिले.

Web Title: Committee inspects the works of 'Jalyukat' at Chichondi Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.