चिमुकल्यांनी भरले ‘गुणवत्ते’चे रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:20 AM2021-02-14T04:20:51+5:302021-02-14T04:20:51+5:30

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित ...

The colors of ‘quality’ filled with sparkles | चिमुकल्यांनी भरले ‘गुणवत्ते’चे रंग

चिमुकल्यांनी भरले ‘गुणवत्ते’चे रंग

Next

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत शाळेतील चिमुकल्यांनी आपल्या नाजूक हाताने भौमितिक आकारांना गुणवत्तापूर्ण रंग भरून घवघवीत यश संपादन केले आहे.

जिल्हा गणित अध्यापक मंडळ दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच गणित विषयाची आवड निर्माण होण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करत असते. मंडळाच्या वतीने जानेवारी २०२० मध्ये तालुकास्तरीय भौमितिक आकृती रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील १० शाळेच्या जवळपास ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असल्याचे गणित मंडळाचे जिल्हा सहसचिव प्रा. प्रमोद कातकडे यांनी सांगितले.

या स्पर्धेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तालुकास्तरीय स्पर्धेत बोधेगाव जिल्हा परिषद शाळेतील १७८ सहभागी विद्यार्थ्यांपैकी लहान गटातून प्रथम हर्षल किरण अन्नदाते, द्वितीय अथर्व गोरक्षनाथ कांदे, तृतीय क्रमांक आराध्या सुनील काशिद हिने मिळविला. तर मोठ्या गटातून प्रथम शुभम नवनाथ तांबे, द्वितीय कार्तिक अंकुश खिळे व तृतीय क्रमांक अनुष्का अभिमन्यू शिरसाठ हिने मिळविला आहे.

विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत लबडे, उपाध्यापक कल्पना बटुळे, मंगल निकम, अंबादास पालवे, महेश कराड, चंद्रशेखर पाटील, संतोष राठोड, मेनका ढाकणे, संगीता बडे, अरुण पठाडे, किरण बैरागी, वर्षा झिरपे, संदीप बडे, जयश्री राठोड, अंजली चव्हाण, श्रीकांत पालवे आदी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. यशस्वी मुलांचे उपसरपंच नितीन काकडे, सरपंच सुभाष पवळे, सदस्य सदानंद गायकवाड, शालेय समिती अध्यक्ष सुभाष अकोलकर, उपाध्यक्ष बाबा पठाण आदींसह ग्रामस्थांनी कौतुक केले.

फोटो सहा पासपोर्ट

१३ हर्षल अन्नदाते, शुभम तांबे, अर्थव कांदे, कार्तिक खिळे, अनुष्का शिरसाठ, आराध्या काशिद

Web Title: The colors of ‘quality’ filled with sparkles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.