शिवसेनेचा नगर शहर उपप्रमुखासह दोघांची गोळ्या घालून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 07:00 PM2018-04-07T19:00:48+5:302018-04-08T17:18:51+5:30

The city of Shivsena, along with the Deputy Superintendent of Police, shot two people and shot them | शिवसेनेचा नगर शहर उपप्रमुखासह दोघांची गोळ्या घालून हत्या

शिवसेनेचा नगर शहर उपप्रमुखासह दोघांची गोळ्या घालून हत्या

Next

अहमदनगर : शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांना सायंकाळी सहा वाजता केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. केडगाव येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली.
या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी सुवर्णनगर येथे दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर संतप्त जमावाने पोलीस वाहनांवरही दगडफेक केली. सध्या सुवर्णनगर परिसरात वातावरण तनावपूर्ण बनले असून, जादा पोलीस कुमक पाचारण करण्यात आली आहे. संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे केडगाव येथील सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. याचवेळी दोघा जणांनी त्यांच्यावर रिव्हॉलव्हरमधून गोळीबार केल्याचे समजते. गोळीबाराच्या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. संतप्त जमावाने परिसरातील वाहनांवर जोरदार दगडफेकीला सुरूवात केली. यावेळी स्थानिक व्यवसायिकांनी व रहिवाशांनी घरे व दुकाने बंद करून घेतली. या घटनेला राजकीय पार्श्वभूमी असल्याचे समजते. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: The city of Shivsena, along with the Deputy Superintendent of Police, shot two people and shot them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.