डोंगरावरील पाण्यासाठी वृद्धेश्वर परिसरात सिमेंट पाइप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:18 AM2021-03-07T04:18:36+5:302021-03-07T04:18:36+5:30

करंजी : श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान मंदिर परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात डोंगराचे पाणी साचत होते. पाणी मंदिर परिसरात येऊ ...

Cement pipe in Vriddheshwar area for mountain water | डोंगरावरील पाण्यासाठी वृद्धेश्वर परिसरात सिमेंट पाइप

डोंगरावरील पाण्यासाठी वृद्धेश्वर परिसरात सिमेंट पाइप

googlenewsNext

करंजी : श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान मंदिर परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात डोंगराचे पाणी साचत होते. पाणी मंदिर परिसरात येऊ नये यासाठी मोठमोठे सिमेंट पाइप टाकले जात आहेत. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या श्री क्षेत्र वृद्धेश्वरच्या प्राचीन मंदिराच्या तिन्ही बाजूंनी डोंगराचा वेढा आहे. पावसाळ्यात तीनही बाजूंनी डोंगराचे पाणी मंदिर परिसरात साचत होते. या पाण्यामुळे व चिखलामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कसरत करावी लागत असे. डोंगरातून येणारे पाणी मोठ- मोठ्या सिमेंट पाइपच्या साहाय्याने ओढ्याला सोडण्यात येणार आहे.

ऐन पावसाळ्यात श्रावण महिन्यात श्री क्षेत्र वृद्धेश्वराची मोठी यात्रा भरते. यावेळी वृद्धेश्वरच्या दर्शनासाठी राज्यातूनच नव्हे तर परराज्यांतूनही मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. मंदिर परिसरातील साचलेले पाणी, चिखलामुळे भाविकांना कसरत करावी लागत होती. या कामाबरोबरच संपूर्ण मंदिर परिसरात फरशी बसविण्याचे कामही लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त व व्यवस्थापक शिवाजीराव पालवे यांनी दिली.

----

०६ वृद्धेश्वर

वृद्धेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेली पाइपलाइन.

Web Title: Cement pipe in Vriddheshwar area for mountain water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.